शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

विमानतळाच्या विरोधात ग्रामस्थांचा एल्गार

By admin | Published: November 08, 2016 1:15 AM

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याचेच प्रत्यंतर आज सासवडमध्ये काढलेल्या मोर्चात आले

सासवड : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. याचेच प्रत्यंतर आज सासवडमध्ये काढलेल्या मोर्चात आले. आबालवृद्ध महिलांसह सात गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेले होते. पुरंदरमधील राजेवाडी, वाघापूर, आंबळे, मेमाणे-पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या बाधित सात गावांतील ग्रामस्थांनी सासवड येथे मूकमोर्चा काढण्यात आला. मात्र, आचारसंहितेचे कारण सांगत तहसील कचेरीवर मोर्चेकरांना जाऊ न देता नगरपालिकेसमोरच अडवले, त्याठिकाणी नायब तहसीलदार रमेश उळागड्डी यांनी निवेदन स्वीकारले. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजेवाडी, आंबळे, वाघापूर, पारगाव, एखतपूर-मुंजवडी, खानवडी या भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर या भागातील शेतकरी व नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक गावातील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन आपला विरोध प्रकट केला. तसेच तहसीलदार कार्यालयात प्रत्येक गावाने स्वतंत्रपणे निवेदने दिली. तसेच प्रांताधिकारी कार्यालय, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी कार्यालय, खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देऊन आपला विरोध प्रकट केला आहे. त्यानंतर पुन्हा विमानतळाला तीव्र विरोध करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. आपल्या व्यथा शासनाकडे मांडण्यात आल्या. मात्र, शासनाकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. त्याचेच प्रत्यंतर आज सासवड येथील मूक मोर्चामध्ये दिसून आले. नको पॅकेज नको सर्वेक्षण येथील शेतकरी दुग्ध आणि कुकुटपालन हे शेतीपूरक व्यवसाय करतो तसेच बागायती जमिनी गेल्यास शेतकरी उध्वस्त होईल त्यामुळे आम्हाला कोणतेही पॅकेज नको, शासनाने कोणत्याही प्रकारची सर्वेक्षण करू नये तसेच जमिनींवर आरक्षणाचे शिक्के टाकू नये, आमच्यावर शासकीय बाळाचा वापर करू नये, प्रस्तावित विमानतळाला जमिनी द्यायच्या नाहीत यावर आम्ही ठाम आहोत असेही या निवेदनात सांगितले आहे. यावेळी या भागातील शेतकरी व पंचायत समिती सदस्य दत्तात्रय झुरंगे, नीरा मार्केट कमिटीचे संचालक सुनील धिवार, वाघापूरचे माजी सरपंच बाजीरावशेठ कुंजीर, पारगावचे सरपंच सजेर्राव मेमाणे, उपसरपंच संगीता मेमाणे, एखतपूर - मुंजवडी चे सरपंच आशा निंबाळकर, खानवडीच्या सरपंच दिपाली होले, उपसरपंच वैजयंता झुरंगे, राजेवाडीच्या सरपंच पुष्पांजली बधे, उपसरपंच गौतम जगताप, वाघापूरचे सरपंच छाया वाघमारे, उपसरपंच अशोक कुंजीर, आंबळेचे सरपंच मंगेश गायकवाड, उपसरपंच परसराम जगताप त्याच प्रमाणे या गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या मूकमोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत होती. लोकप्रतिनिधींनी जनतेचे ऐकावे एकीकडे बाधित गावातील नागरिकांचा तीव्र विरोध होत असताना सरकारमध्ये असलेले राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी या भागातील नागरिकांशी चर्चा करावी. त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, शासनाने काय निकष ठरवून दिले आहेत ते नागरिकांना सांगावे, अशी नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली आहे.स्थनिकांनाडावलू नका जनतेचा विरोध डावलून सर्वच कार्यक्रमांमध्ये विषय नसताना विमानतळ होणारच असे सांगून कोणताही संबंध नसताना सडकून टीका करीत आहेत. तसेच विमानतळ मीच मंजूर केले आहे असे सांगून एकप्रकारे श्रेय घेण्याच्या प्रयत्नामध्ये विरोधकांसह स्थानिक शेतकऱ्यांनाही डावलत आहेत. त्यामुळे विरोध मावळण्याऐवजी तो दिवसेंदिवस वाढत आहे, अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.