नूतन ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांचा संभाजी ब्रिगेड पुरंदर शाखेच्यावतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रवीण गायकवाड बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे, उद्योजक पांडूरंग सोनवणे, उद्योजक रवींद्र जोशी, सुधार गोडसे, जयदीप बारभाई, सचिन सोनवणे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री मार्तंड देवसंस्थान, सुवर्णस्टार स्पोर्ट क्लब, उपकार चारिटेबल ट्रस्ट, उघडा मारुती मंडळ या संस्थांचा आणि नूतन ग्रामपंचायत सदस्य, गुणवंत शिक्षकांचा व कोरोना योद्ध्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
जिल्हा नियोजन मंडळावर निवड झाल्याबद्दल माणिकराव झेंडे, सामाजिक कार्यात पीएच.डी. मिळाल्याबद्दल राजकुमार लोढा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. दिगंंबर दुर्गाडे व सामाजिक कार्यक्रमात योगदान देणारे मेहबुब पानसरे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
आमदार संजय जगताप यांनी पुरंदर तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामाची माहिती दिली.
यावेळी दिलीप बारभाई, डॉ. दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, राजकुमार लोढा, अजयसिंह सावंत, विश्वस्त संदीप जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अजयसिंह सावंत, संदीप जगताप, सागर जगताप, विक्रम फाळके, संतोष हगवणे, शिवाजी जगताप, संतोष बयास, विक्रम शिंदे, अजय पठाण, नीलेश जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.