वरवंड: राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाने वरवंड परिसरातील कामांकडे दुर्लक्ष केले होते. त्यासंदर्भात स्थानिकांनी पत्रव्यवहार केला होता. तरीही याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे शुक्रवारी महामार्ग प्राधिकारणाच्या सीएनजी गॅस पाइप लाइनचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले. दरम्यान, जो पर्यंत महामार्गाची प्रलंबित कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत हे काम सुरु करु देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होऊन दहा वर्षे झाली आहे मात्र या महामार्गा कडे सर्व्हिस रस्ता,गटार लाइन ,ठीक ठिकाणी लाइट, रस्ता दुरुस्ती यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून ही कामे न करता दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप होता. त्यातच शुक्रवारपासून वरवंड वरून जाणाऱ्या सीएनजी गॅस पाइपलाइन चे काम चालू होते. या कामाला महामार्ग प्राधिकरणाने मंजूरी दिली असल्याचे समजताच ग्रामस्थांनी सुरु असलेले हे काम बंद पाडले
संबंधित भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण व पाटस टोल यांच्याकडे अपूर्ण कामाबाबत वारंवार पत्रव्यवहार करून ही यांचे दुर्लक्ष केले जात आहे आमचा या कामाला विरोध नाही पण आम्ही कित्येक वर्षे कामासाठी पत्रव्यवहार करून जाणून बुजून त्रास दिला जात आहे. या अपुर्ण कामामुळे कित्येक जणांचे जीव गेले आहेत. असे वरवंडचे उपसरपंच प्रदीप दिवेकर यांनी सांगितले.
यावेळी मारुती फरगडे, किशोर दिवेकर, राहुल दिवेकर, वाल्मिक सातपुते,
संदीप दिवेकर,सिद्धाथ रणधीर आदी उपस्थित होते.
०९ वरवंड गॅस
ग्रामस्थांबरोबर चर्चा करताना पाटस टोलचे अधिकारी.