जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, श्रीनगर, तळेगाव (NDRF), गोलाघाट आसाम व राजमुंडरी हैदराबाद येथे त्यांनी खडतर देशसेवा केली आहे. खडतर ठिकाणी वीस वर्षे प्रामाणिकपणे देशसेवा केलेले लोणारी नुकतेच सेवानिवृत्त झाले. या पार्श्वभूमीवर गावात त्यांची ढोलताशांच्या तसेच देशभक्तिपर गीते लावून मिरवणूक काढण्यात आली. गावच्या वतीने उपसरपंच दिगंबर लोणारी, युवानेते मयूर मोहिते, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मुचकुंद जाधव, शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती तुकाराम कुटे, माजी उपसरपंच सर्जेराव लोणारी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी चेअरमन श्रीकांत लोणारी, तंटामुक्ती अध्यक्ष दादाराव कुटे, माजी चेअरमन तानाजी कुटे, माजी उपसरपंच संभाजी कुटे, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस गणेश दळवी, अध्यक्ष मयूर कुटे, माजी उपसरपंच बाबासाहेब मुंगसे, सूर्यकांत मुंगसे, लक्ष्मीकांत मुंगसे, अनिकेत केदारी, कालिदास मुंगसे, विलास मुंगसे, बाळू मुंगसे, मधुकर कुटे, अमोल लोणारी, तेजस कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
माझ्या आयुष्यातील हा परमोच्च आनंदाचा क्षण असल्याची गर्भित भावना सेवानिवृत्त जवान मल्हारी लोणारी यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुचकुंद जाधव तर तुकाराम कुटे यांनी आभार मानले.
फोटो ओळ : भोसे येथे सेवानिवृत्त जवान मल्हारी लोणारी यांचा सत्कार करताना मान्यवर. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)