शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

गावोगावी 'जल'जागृती

By admin | Published: March 18, 2016 3:03 AM

सतत कमी पडणारा पाऊस... धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा... अशी स्थिती सातत्याने राज्यभरात असल्यामुळे आता सर्व शासकीय खात्यांमार्फतच जलजागृती अभियानाचा

- महेंद्र कांबळे,  बारामतीसतत कमी पडणारा पाऊस... धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा... अशी स्थिती सातत्याने राज्यभरात असल्यामुळे आता सर्व शासकीय खात्यांमार्फतच जलजागृती अभियानाचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल, कृषी आणि जलसंपदा खात्याकडे प्रामुख्याने सोपविली आहे. ाागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्तच घटले. धरणांमध्येदेखील पाणी साठले नाही. शेती, पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांसाठी पाणी, असे नियोजन करताना जलसंपदा खात्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना पश्चिम महाराष्ट्रातदेखील दिवसेंदिवस पाण्याची भूगर्भातील पातळी खालावत आहे. कालव्यांची आवर्तने लांबली आहेत. धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी होत आहे. जवळपास ४ जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उजनीसारख्या मोठ्या धरणांचा पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे आता जलजागृती अभियानाच्या माध्यमातून पाणीबचतीची मोहीम राज्य सरकार राबविणार आहे.सध्या उजनीचा उपयुक्त साठा वजा १४.७४ टक्के आहे. तर, एकूण साठा वजा २७.५७ टक्के आहे. आणखी ३ महिने शिल्लक पाण्यासाठी तग धरावा लागणार आहे. उजनीचे पाणी शेतीसाठी सोडणे बंद करण्यात आले आहे. जलसंपदा, कृषी, महसूलसह सर्व शासकीय, निमशासकीय खात्यांना या जलजागृती अभियानासाठी राज्य शासनाने फतवाच काढला आहे. त्यानुसार जलसंपदा खात्यामार्फत दि. १६ ते २२ मार्चदरम्यान अभियान राबविले जाणार आहे. जलजागृती अभियानात पिकांसाठी पाणी देण्याची पद्धत बदलणे, पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनचा अधिकाधिक वापर, पाण्याचा पुनर्वापर करणे, यांसह इतर उपाययोजना करण्यासाठी जलजागृती केली जाणार आहे.200 ते 250 फुटांपर्यंत खोदलेल्या विंधन विहिरींचे पाणी आटले असून विहिरी कोरड्या पडल्या अवस्थेत आहेत. कालव्यांची आवर्तने लांबली आहेत. दुष्काळाची अशी भीषण परिस्थिती डोळ्यासमोर असताना पहिल्यांदाच जलजागृतीसाठी जलसंपदा खात्याला पुढाकार घ्यावा लागला आहे. राज्य सरकारने यापूर्वी मोठी धरणे बांधण्यापेक्षा नाले, नदी, ओढे आदींचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचा कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर पाझर तलावातील गाळ उपसण्याची मोहीम राबविली आहे. आता राज्यात गावोगावी जलजागृतीची मोहीम राबणार आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह लोकांचा सहभाग, शेतकरी मंडळांचा सहभाग घेतला जाणार आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि. बा. जाधव, उपविभागीय अभियंता ए. आर. भोसले यांनी दिली.