पुणे : सध्या एका वाहिनीवरील एका शेतकऱ्याचे त्याच्या बैलाशी असलेले जिव्हाळ्याच्या नात्याचे सर्वत्र काैतुक हाेत अाहे. बैल हा शेतकऱ्यासाेबत शेतात राबणारा त्याचा साथी असताे. शेतकऱ्याचे अापल्या बैलाशी एक भावनिक नाते असते. शेतकरी अापल्या बैलांना मुलांप्रमाणे वाढवत असताे. अश्याच एका बैलाच्या जाण्याने पुणे जिल्ह्यातील कुरुळीगावात शाेककळा पसरली अाहे. 'घाटाचा राजा' अशी ख्याती असलेल्या 'झेंडा' या बैलाचे वृद्धपाकाळाने 14 जुलै राेजी निधन झाले. त्याच्या निधनाने संपूर्ण गाव सध्या दुःखात अाहे.
कुरुळी गावच्या मु-हे कुटुंबीयांचा 'झेंडा' हा बैल हाेता. अाबाजी माेरे यांनी चाकणच्या एका व्यापाऱ्याकडून त्याला 11 हजार रुपयांना 30 वर्षापूर्वी खरेदी केला हाेता. तेव्हापासून मु-हे कुटुंबियांचा झेंडा हा एक अविभाज्य घटक झाला हाेता. पुणे जिल्ह्यात हाेणाऱ्या बैलगाडा शर्यतीमध्ये झेंडा हा नेहमी पहिला येत असे. मु-हे कुटुंबियांनी नेहमीच झेंडाला अापल्या मुलाप्रमाणे वाढवले. शर्यतींच्या व्यतिरिक्त त्याला त्यांनी इतर शेतीच्या कामाला कधीच जुंपले नाही. त्याच्या घरात येण्याने त्यांच्या घराला एक भरभराट प्राप्त झाली हाेती. गेल्या 10 वर्षांपासून ताे शर्यतीत भाग घेण्यापासून बाद झालेला असताना मु-हे कुटुंबियांनी त्याला कधीही दुजाभाव केला नाही. त्याला पहिल्यासारखेच त्यांनी सांभाळले. झेंडाच्या शर्यतीतील कामगिरीमुळे पुणे जिल्ह्यात त्याची ख्याती पसरली हाेेती. त्याच्या जाण्याने गाववार शाेककळा पसरली अाहे. ग्रामस्थ मु-हे कुटुंबीयांच्या घरी येऊन त्यांचे सांत्वन करत अाहेत.
झेंडाच्या निधनानंतर मु-हे कुटुंबियांनी धार्मिक विधी करुन त्याला अापल्या शेतातच पुरले. त्याची अाठवण कायम अापल्या साेबत रहावी अशी त्यांची इच्छा अाहे. अाबासाहेब माेरे म्हणाले, झेंडा अामच्या कुटुंबियांचा जिव्हाळ्याचा विषय हाेता. त्याच्या जाण्याने कधीही भरुन न येणारी पाेकळी निर्माण झाली अाहे. अाम्ही त्याला कधीही विसरणार नाही.