पुणे - लेह ते कन्याकुमारी हा ४ हजार किलोमीटरचा प्रवास अवघ्या ९८ तासांत पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला विनया फडतरे-केत (३४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगी, सासू, सासरे, आई, भाऊ असा परिवार आहे.लेह ते कन्याकुमारी प्रवासाबद्दल त्यांची लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड तसेच इंडियाज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.फर्ग्युसन तसेच सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयातही त्यांनी अध्यापन केले होते. अलिकडेच पीएचडीचा प्रबंध विद्यापीठात सादर केला होता.
विनया फडतरे-केत यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 3:39 AM