शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विनोद खन्ना संन्याशाप्रमाणे राहत होते ओशो आश्रमात

By admin | Published: April 27, 2017 4:02 PM

ऐन बहरात असलेली कारकिर्द सोडून विनोद खन्ना ओशो रजनीश यांचे भक्त झाले. पुण्यातील आश्रमात १९७५ ते १९८१ पर्यंत ते अगदी

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 27 - ऐन बहरात असलेली कारकिर्द सोडून विनोद खन्ना ओशो रजनीश यांचे भक्त झाले. पुण्यातील आश्रमात १९७५ ते १९८१ पर्यंत ते अगदी सामान्य संन्याशाप्रमाणे राहत होते. माळीकामही करत होते. ओशो आश्रमातील विनोद खन्ना यांच्या सहकारी आणि ओशो टाईम्सच्या संपादक मा अमृत साधना आठवणी सांगताना म्हणाल्या , ओशोंनी विनोद खन्ना यांना आश्रमातील खासगी उद्यानामध्ये माळीकाम करण्यास सांगितले. एका स्टारचा सारा अहंकार विसर्जित व्हावा असा ओशोंचा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला. एका लहानशा खोलीमध्ये त्यांना राहण्यासाठी जागा देण्यात आली. त्या खोलीमध्ये या आधी दोन संन्याशांचा मृत्यु झाला आहे, असे अन्य संन्यासी विनोद यांना सांगत. ओशोंची मृत्युविषयी जी शिकवण आहे, ती विनोद जगले. नंतर मृत्यु हा शब्द ऐकल्यावर विनोद खळखळून हसत असत.

त्या म्हणाल्या,   विनोद खन्ना ( स्वामी विनोद भारती) ओशो यांचे परम भक्त होते. त्यांना ध्यानधारणेत खूप रस होता. खूप प्रेमळ माणूस होता.सर्वांशी खेळीमेळीने राहत. त्यांना आश्रमातील लाईफ स्टाईल आवडत असे. ते आश्रम सोडून गेल्यानंतर परत आले नाहीत, मात्र अंतर्मनातून ते ओशोंच्या कायमच सान्निध्यात राहिले. १९७५ ते १९८१ दरम्यान विनोद खन्ना ओशो आश्रमात होते. विजय आनंद, महेश भट, सुभाष घई हेही त्याच वेळी आश्रमात येत असत. चित्रपटांची कामे आटोपून ही मंडळी आश्रमात राहण्यासाठी येत. ओशोंच्या माऊंट अबू येथील शिबिरामध्ये सहभागी झाल्यानंतर विनोद खन्ना यांनी पूर्णवेळ ओशोंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. ओशोंनी त्यांना संमती दिली. मा अमृत साधना म्हणाल्या,  विनोद खन्ना यांना ओशो यांच्या शब्दांनी आयुष्यातील ज्वलंत वास्तवाचा परिचय करवून दिला. वयाच्या आठव्या वर्षापासूनच साधू, संन्यासी यांच्याविषयी विनोद यांना आकर्षण होते. पुढे ते ओशोंची प्रवचने ऐकू लागले. त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर असताना, वयाच्या २६/२७ व्या वर्षी त्यांच्या घरात आई, बहिण यांचा लागोपाठ मृत्यु झाला. विनोद यांनाही मृत्युचे भय वाटू लागले.ओशोंच्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी या विभुतीशी आपली अनेक जन्मांची ओळख आहे, असे त्यांना वाटले.लार्जर दॅन लाईफचा अनुभव आला. आपल्या स्वत:च्या घरी परतल्यासारखे वाटले. 

मा अमृत साधना म्हणाल्या, वेगवेगळ्या ध्यानपध्दतींमध्ये विनोद खन्ना सहभागी होत. आश्रमातील सामान्य संन्याशासारखीच त्यांची राहणी होती. त्यांना ध्यानधारणेत खूप रस होता.१९८१ मध्ये ओशो अमेरिकेत गेले, तेव्हा विनोद खन्ना त्यांच्यासोबत तिकडे गेले. दोन वर्षे तेथील आश्रमात ते होते. १९८४ मध्ये ओशोंच्या तेथील आश्रमाबाबत वाद उत्पन्न झाला. ओशो वलर््ड टुरवर निघून गेले. त्यानंतर विनोद खन्ना पुन्हा मुंबईत परतले. त्यानंतर ते चित्रपटसृष्टीत व्यग्र झाले. राजकारणात गेले. नंतर ते ओशो आश्रमात आले नाहीत. मात्र आतून ते ओशोंच्या कायमच सान्निध्यात राहिले.