लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सुरू झालेली एसटी सेवा आता पूर्व पदावर आली आहे. जिल्ह्यात व राज्यात एसटीची सेवा सुरू आहे. मात्र आंतरराज्यमध्ये केवळ कर्नाटक सरकारने एसटीला प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. गोवा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांनी अद्याप परवानगी दिलेली नाही.
स्वारगेट बसस्थानकावरून पुणे विभागाची केवळ कर्नाटकसाठी सेवा सुरू आहे. यात बिदर, गुलबर्गा, गाणगापूर आदी शहरांची सेवा सुरू आहे. पूर्वी स्वारगेट बसस्थानकावरून अहमदाबाद, पणजी, इंदोर, या शहरासाठी सेवा सुरू होती ती आता बंद आहे.
बॉक्स १
जिल्ह्यात एकूण आगार : १३
एकूण बसेस : ८३८
रोज होणाऱ्या फेऱ्या : १५१६
दुसऱ्या राज्यात जाणारे बस : ६
चौकट
पुन्हा तोटा वाढला
राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाला पूर्वी रोज दीड कोटीचे उत्पन्न मिळत होते. ते आता ४० ते ५० लाख रुपयांपर्यंत घसरले आहे. तर एसटीचे संपूर्ण राज्यातील एका दिवसाचे उत्पन्न २२ कोटी रुपये होते. ते आता ८ कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे.
चौकट
परराज्याला कमी प्रतिसाद
स्वारगेट बसस्थानकावरून बिदर, गुलबर्गा, गाणगापूर आदी शहरांसाठी एसटी सोडल्या जातात. रोज जवळपास ६ गाड्या या मार्गांवर धावतात. त्यालादेखील फारसा प्रतिसाद लाभत नाही. प्रत्येकी गाडीत जेमतेम दहा-बारा प्रवासी असतात.
चौकट
कोणत्या मार्गावर प्रतिसाद चांगला?
स्वारगेट बसस्थानकावरून मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांना चांगला प्रतिसाद आहे.
चौकट
कोणत्या मार्गावर कमी प्रतिसाद?
पुणे विभागाच्या लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड आदी शहरांना जाणाऱ्या गाड्यांना कमी प्रतिसाद लाभत आहे.