शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

व्हायरल पोस्टमुळे संपाबाबत संभ्रम, शेतकऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 2:30 AM

शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी एक जूनपासून किसान क्रांती संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. मात्र, या संपात सहभागी न होण्याचे आवाहन करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्यामुळे संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय, अशी शंका शेतक-यांमधून व्यक्त होते.

पिंपळवंडी - शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी एक जूनपासून किसान क्रांती संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. मात्र, या संपात सहभागी न होण्याचे आवाहन करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्यामुळे संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे की काय, अशी शंका शेतक-यांमधून व्यक्त होते. यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.शेतीमालाला व दुधाला बाजारभाव मिळत नाही; त्यामुळे शेतकरी संघटनांनी एक जून ते दहा जूनदरम्यान संप पुकारला आहे. राज्यातील काही संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. तर, काही शेतकरी संघटनांनी संप केल्यानंतर शेतकºयांच्या शेतमालाचे नुकसान होणार असल्याचे कारण देऊन संपात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यातच सध्या सोशल मीडीयावरुन एक पोस्ट व्हायरल झाली आहे. तीमध्ये ‘१ते १० जून जो बंद पुकारण्यात आला आहे, तो मोठ्या शेतकºयांकडून पुकारण्यात आलेला आहे.नाशिक येथील टॉमेटो, द्राक्ष व डाळिंब संपली आहेत; त्यामुळे ते शेतकरी आता मोकळे झाले आहेत. त्यांनी १ डिसेंबर ते २५ मार्च या महिन्यात संप करावा. जुन्नर तालुक्यातील शेतकरी छोटे आहेत, त्यांचा सिझन २० मेपासून २५ जुलैपर्यंत चालू असतो. हे शेतकरी छोटे शेतकरी असून त्यांच्याकडे असलेल्या जमिनी या गुंठ्यांत आहेत. मोठा मासा छोट्या माशाला खातो तसेच मोठा शेतकरी छोट्या शेतकºयाला मारत आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील एकही छोटा शेतकरी संपावर जाणार नाही. मागीलवर्षी असाच काहीसा प्रकार मोठ्या शेतकºयांनी केला व गरीब शेतकरी मारले गेले. त्यामुळे या वर्षी संपूर्ण जुन्नर तालुक्यातील शेतकरी संप करणार नाहीत, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.पोस्टवरून लहान शेतकरी आणि मोठा शेतकरी, असा भेदभाव करून त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचा तर हा प्रकार नाही ना, असा प्रश्नही शेतकºयांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या संपात फूट पाडली जात आहे की काय, अशी शंका शेतकरी उपस्थित करीत असून या पोस्टमुळे शेतकºयांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणेagricultureशेतीStrikeसंप