शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

भूसंपादनात शिरलाय ‘व्हायरस’

By admin | Published: August 28, 2016 5:20 AM

जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात येत

वाकड : जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या पर्यायी रस्त्यांच्या कामाला भूसंपादनाची बाधा झाल्याने ही कामे रखडली आहेत. स्थानिकांचा विरोध अन एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेने ही बाधा लवकर सुटण्याचे चिन्ह दिसत नाहीत. युद्धपातळीवर हे काम सुरूअसल्याचे भासविले जात असले, तरी अद्याप काही रस्त्यांचे भूसंपादनदेखील झाले नसल्याचे लोकमतने घेतलेल्या आढाव्यात समोर आले आहे. वाहतूककोंडीतून मार्ग काढून आयटीयन्सचा वेळ वाचविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पर्यायी रस्त्यांचे काम युद्धपातळीवर करून ते रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्याशिवाय हिंजवडीतील वाहतूककोंडीची समस्या सुटणार नाही. दरम्यान, वाहतूक विभागाच्या नियोजित संख्येपेक्षा दररोज कित्येक पटीने वाहनांची वर्दळ या ठिकाणी वाढतच आहे. त्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. भूमकर वस्तीपासून विनोदे वस्तीमार्गे हिंजवडी लक्ष्मी चौक ते पुन्हा फेज दोन टाटा जॉन्सन हा रस्ता तीनशे मीटरचा आहे. राजीव गांधी आयटी पार्कमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याकडे जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता फायदेशीर ठरू शकतो. फेज दोनकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित आणि अर्धा रस्ता महापालिकेच्या अंतर्गत असे या सहापदरी रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र, रस्त्यावरील एका जुन्या नाल्यावर छत्तीस मीटरचा पूल बांधण्याचे काम सुरू झाल्यांनतर काही स्थानिकांनी विरोध केला त्यामुळे नाल्याचेदेखील काम बंद पडले अन पालिकेने अखेर तो नाला बुजविला. या रस्त्यादरम्यान दोन ठिकाणी मोठ्या लांबीचे काम थांबले आहे. तर विनोदे वस्तीच्या हद्दीपासून पुढील रस्ता अचानक अरुंद झाला आहे. या रस्त्यात प्रचंड तफावत जाणवते, तर लक्ष्मी चौकापासून पुढील रस्त्याचे काम भू-संपादनाला झालेल्या विरोधामुळे थांबले होते. मात्र, हा प्रश्न मार्गी लागल्याने काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. आयटी पार्ककडे चांदे-नांदे मार्गे सूसमध्ये येताच लहान पूल असल्याने वाहतूककोंडी होते. त्यामुळे सूस खिंडीत त्वरित भुयारी मार्ग करावा, जेणेकरून रस्ता मोठा व पर्यायी मिळाल्याने वाहने विनाअडथळा जातील. तसेच वाकड येथील राजीव गांधी पुलाच्या मागील आणि पुढील रस्ता प्रशस्त सहापदरी आहे. मात्र, हा पूल दोनपदरी असल्याने वाहतूक येथे खोळंबते. त्यामुळे या पुलाला आणखी एक समांतर पूल उभारावा, तसेच इन्फोसीस फेज १ ते घोटावडे या १३ किमी लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता चारपदरी केल्यास पिरंगुटमार्गे वाहतूक सुरळीत होईल. अशा अन्य रस्त्यांची मागणी प्रशासनाकडे केल्याची माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन व आॅपरेटिंग प्रमुख कर्नल चरणजीत भोगल यांनी दिली. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या दोन ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्याचे सुचविले होते. (वार्ताहर)लवकरच कामे पूर्ण करणारआयटी पार्कमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी काही प्रस्तावित पर्यायी रस्त्यांचे काम पूर्णत्वास जात असून, काही येत्या दोन-तीन महिन्यांत कामे पूर्ण होतील, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुधीर नागे यांनी दिली. यासह भू-संपादनाला काही स्थानिक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या विरोधामुळे भू-संपादन प्रक्रिया थंडावल्याने कामांना उशीर होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, योग्य तो तोडगा काढून कामे लवकर सुरू करण्याचे पीएमआरडीए आणि एमआयडीसीचे प्रयत्न सुरू आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.कामे अद्याप रखडलेलीपुणे शहरातून आयटी पार्ककडे येताना वारजे, बाणेरमार्गे पुणे-मुंबई महामार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे भुजबळ चौक, शिवाजी चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून सूस चांदे-नांदेमार्गे असणाऱ्या जुन्या रस्त्याची एमआयडीसीने डागडुजी व रुंदीकरण कले. मात्र, याची रुंदी कमी असल्याने तो रस्ता वाढवावा, अशी मागणी होत आहे. मात्र, हे काम अद्याप तरी रखडले आहे. यंदाच्या पावसाळ्यात यादेखील पर्यायी रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरण आणि रुंदीकरणाचा प्रस्ताव गेला आहे, असे एमआयडीसीकडून सांगण्यात येत आहे.