भारत गौरव अवॉर्ड फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या वतीने भारत युवा पुरस्कार २०२१ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर तथा केंद्रीय ग्रामीण विकास तथा इस्पात राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते , केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री जॉन बारला, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत, खा. सुधीर गुप्ता, खा. श्याम सिंग यादव, रिपब्लिक ऑफ इथोपियाचे अँम्बेसेडर डॉ. तिझिता मुलुगेटा, अतिरिक्त मुख्य सचिव ज्योती कलाश, एनसीएमईलचे संचालक जस्टीस एन. के. जैन, सहाय्यक आयुक्त भारत सरकार दिनेश जगींड, अटीका गोल्ड कंपनीचे संचालक डॉ. बॉम्मानहल्ली बाबू , भारत गौरव अवॉर्ड फाउंडेशनचे सहसचिव संदेश यादव यासह इतरांची उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते रेल्वे मंत्रालय भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य विशाल भुजबळ, महाराष्ट्रातील खासदार श्रीकांत शिंदे तथा खासदार हेमंत पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, लोकसभा सदस्य, संचालक, सर्वोच्च न्यायालयाचे वकील, युथ आयकॉन, लेखक यांना भारत युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशाल भुजबळ यांनी भारत सरकारच्या रेल्वे विकास समितीचे सल्लागार सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवर पुरेशा सुविधामध्ये पाणी, सुरक्षा आणि चांगले अन्न देण्याबाबत स्वतः प्रशासनाशी बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावत आहेत. अनेकांना कोरोना काळात मदतीचा हात दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भारत गौरव युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
१४ नारायणगाव