शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

विशाल भुजबळ भारत युवा पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:13 AM

नारायणगाव : नारायणगाव येथील आणि रेल्वे मंत्रालय भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य विशाल दिलीप भुजबळ यांना भारत युवा ...

नारायणगाव : नारायणगाव येथील आणि रेल्वे मंत्रालय भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य विशाल दिलीप भुजबळ यांना भारत युवा पुरस्काराने केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

भारत गौरव अवॉर्ड फाउंडेशन नवी दिल्ली यांच्यावतीने भारत युवा पुरस्कार २०२१ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर तथा केंद्रीय ग्रामीण विकास तथा इस्पात राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते, केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री जॉन बारला, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत, खा. सुधीर गुप्ता, खा. श्याम सिंग यादव, रिपब्लिक ऑफ इथोपियाचे अँबेसिडर डॉ. तिझिता मुलुगेटा, अतिरिक्त मुख्य सचिव ज्योती कलाश, एनसीएमईलचे संचालक जस्टीस एन. के. जैन, सहाय्यक आयुक्त भारत सरकार दिनेश जगिंड, अटिका गोल्ड कंपनीचे संचालक डॉ. बॉम्मानहल्ली बाबू, भारत गौरव अवॉर्ड फाउंडेशनचे सहसचिव संदेश यादव यांसह इतरांची उपस्थित होते.

या कार्यक्रमात राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते रेल्वे मंत्रालय भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य विशाल भुजबळ, महाराष्ट्रातील खा. श्रीकांत शिंदे तथा खा. हेमंत पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, लोकसभा सदस्य, संचालक, सर्वोच्च न्यायालयाचे वकील, यूथ आयकॉन, लेखक यांना भारत युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशाल भुजबळ यांनी भारत सरकारच्या रेल्वे विकास समितीचे सल्लागार सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवर पुरेशा सुविधांमध्ये पाणी, सुरक्षा आणि चांगले अन्न देण्याबाबत स्वतः प्रशासनाशी बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावत आहेत.

अनेकांना कोरोना काळात मदतीचा हात दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भारत गौरव युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.