आंदोलनाला विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण, मठमंदिर संपर्कप्रमुख मनोहर ओक, प्रांत सदस्य श्रीकांत चिल्लाळ, पूर्व पुणे विभाग मंत्री धनंजय गायकवाड, विभाग सहमंत्री संतोष अनगोळकर, कसबा भाग मंत्री गणेश वनारसे, सहमंत्री महेश अमराळे, सरिता अंबिके, ओंकार नाईक, कुणाल जगताप, प्रकाश रेड्डी उपस्थित होते.
किशोर चव्हाण म्हणाले, ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची तुलना जावेद अख्तर यांनी तालिबानींशी केली आहे. राष्ट्र प्रथम ही या संघटनांची विचारधारा आहे. तिन्ही संघटनांनी रस्त्यावर उतरून वेळोवेळी समाजासाठी कार्य केले आहे, याची माहिती अख्तर यांना दिसत नाही. कोविडकाळात देखील या संघटनांचे मोठे काम सर्वांनी पाहिले आहे. जे घराबाहेर कधीच पडले नाहीत, त्यांनी अशी वक्तव्ये करणे चुकीचे आहे.''