पुणे :काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सुरु असताना कदम यांनीच त्याबाबत मोठा खुलासा केला आहे. कदम आणि त्यांच्या निकटचे सहकारी सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर राज्यातील तरुण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले असते. अखेर भाजपप्रवेशाच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण स्वतः कदम यांनी दिले आहे. त्यामुळे तूर्तास तरी या वृत्तावर पडदा पडला आहे.
सुजय विखे भाजप खासदार म्हणून निवडून आल्यावर काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी यापूर्वीच विरोधी पक्षातले आमदार संपर्कात असल्याचे सांगून बॉम्ब टाकलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र आमदार विश्वजीत आणि शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजीत हे भाजपच्या संपर्कात असल्याचे वृत्त सोशल मीडियावरून वेगाने व्हायरल झाले होते. त्यातच राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यामुळे कदम आणि देशमुख यांचा पक्षत्याग तरुण कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला असता. मात्र अशी कोणतीही शक्यता नसल्याचे कदम यांनी स्वतःच जाहीर केल्यामुळे चित्र स्पष्ट झाले आहे.
याबाबत ते म्हणाले की, 'ही चर्चा चुकीची आहे. मी कोणत्याही भाजप नेत्याला भेटलो नाही. कामासाठी एखाद्या सत्ताधारी नेत्याला भेटलो तरी असा अर्थ काढण्याचे कारण नाही.