पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊन काही दिवसच उलटले असताना अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांनाच काय माध्यमांनाही कोणतीच खबर लागू न देता संस्थेमध्ये सोमवारी फिल्मी स्टाईल ‘ एंट्री’ केली. मेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत ‘लंच’ करून संस्थेतील कर्मचार्यांना जवळ घेत ‘तुम्हाला काय वाटतय मी काम करू शकेन का? अशी विचारणा करीत आपल्या सशक्त ‘अभिनया’चे दर्शन घडविले. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी एफटीआयआयमध्ये विद्यार्थी म्हणून आलो होतो. ते दिवस आजही आठवतात. अजूनही ‘विद्यार्थी’ असल्यासारखेच वाटते. विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यासाठी येतात त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. मी खूप सकारात्मक वृत्तीने आज संस्थेमध्ये आलो आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचा माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेन, असे आश्वासन स्टुडंट असोसिएशनला दिले असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
सशक्त ‘अभिनया’चे विद्यार्थ्यांना घडले दर्शन; एफटीआयआयमध्ये अनुपम खेर यांची ‘फिल्मी स्टाईल’ एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 3:05 PM
अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांनाच काय माध्यमांनाही कोणतीच खबर लागू न देता संस्थेमध्ये सोमवारी फिल्मी स्टाईल ‘एंट्री’ केली.
ठळक मुद्देअजूनही ‘विद्यार्थी’ असल्यासारखेच वाटते : अनुपम खेरविद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे स्टुडंट असोसिएशनला आश्वासन