लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला लस देण्यात यावी, लसीकरण करताना लसीचे वेस्टेजचे प्रमाण शून्य असले पाहिले, लसीकरणासाठी लाभार्थी लसीकरण केंद्रापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करावे तसेच पुढील दोन दिवसांत तालुक्यातील पाच हजार लाभार्थींना लस देण्यात यावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांना दिल्या.
आरोग्य केंद्रात चालू असलेल्या लसीकरणाबाबत व इतर कामकाज बाबत डॉ. प्रशांत कुटे यांनी माहिती दिली. याप्रसंगी श्रीमती जनाताई उगले, आरोग्य सहाय्यक दीपक गाडीलकर व भरत ननवरे उपस्थित होते.
--
24032021-ॅँङ्म-ि07 - डिंभे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणात मार्गदर्शन करताना आयुष प्रसाद