शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

जगातील मोठ्या घुमटाला नेपाळच्या शिष्टमंडळाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 1:45 AM

नेपाळ येथील सरकारी अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व राजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वांत मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृह व विश्वशांती ग्रंथालयाला भेट दिली

कदमवाकवस्ती : धार्मिक व जातीय संतुलन एकत्रित करण्यासाठी सद्भावना व देशातील सर्व धर्मांतील लोकांना एकत्रित करण्यासाठी या अशा प्रकारच्या घुमटामुळे फार मोठा उपयोग होणार आहे. याचीच प्रेरणा घेऊन नेपाळमध्ये आम्हीपण अशा प्रकारचे कार्य करण्याचा प्रयत्न करू, असे उद्गार नेपाळच्या प्रदेश एकचे शिक्षण व आरोग्य, सांस्कृतिक, युवक कल्याण, सामाजिक न्याय महिला व बाल कल्याण मंत्री जीवन घिमिरे यांनी काढले.

नेपाळ येथील सरकारी अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व राजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वांत मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृह व विश्वशांती ग्रंथालयाला भेट दिली. या वेळी कनकाई नगरपालिकेचे महापौर राजेंद्र पोखरेला यांच्यासह ८ सदस्यांचा समावेश होता. यामध्ये केबीए ऊर्जाचे एमडी दीपक छपगैरी, आयओसीचे मेंबर राजकुमार कोटले, कंकई वड्रो दोनचे परशुराम गिरे, येनोंगी मेंबर जीबन श्रेष्ठ, डमक एनपी टाक बहाद्दूर थापा व इंजिनिअर पवन गिमेरिया यांचा समावेश होता.जीवन घिमिरे म्हणाले, ‘‘डॉ. कराड या एकाच व्यक्तीने जे उभे केले, ते त्यांचे मोठे योगदान आहे. याचे उदाहरण आम्ही घेतलेच पाहिजे. त्यांचे व्हिजन उत्तम आहे. सद्भाव, धार्मिक आणि सहिष्णुता यातून निर्माण होईल. नेपाळमध्ये एक मोठी नदी आहे. तेथे सर्व धर्मांसाठी एकत्रित असे स्फूर्तिस्थान उभे करण्याचा आमचा मानस आहे.’’शेजारधर्म निभावताना डॉ. विश्वनाथ कराड यांनी यापूर्वी काठमांडू नगरपलिका हद्दीत भूकंपग्रस्तांसाठी ज्ञानेश्वर, तुकाराम व विवेकानंद यांच्या नावाने १२० घरे बांधून दिली आहेत.तेथे आमचे राज्य सरकार काही विकासात्मक सुधारणा करणार आहे. त्या विकासकार्यासाठी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचे मोलाचे योगदान असावे.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. या प्रसंगी शिष्टमंडळाला विश्वशांती केंद्राचे सल्लागार, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी विश्वशांती केंद्राच्या कार्याची माहिती दिली. तसेच, मिटसॉगचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पाडे यांनी डोमसंदभार्तील विस्तृत माहिती दिली. या वेळी पर्यावरण शांती सूरज गायकवाड, राजेंद्र रणभोर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.४कनकाई नगरपालिकेचे महापौर राजेंद्र पोखरेला म्हणाले, ‘‘डॉ. कराडांची दूरदृष्टी एकमेवाद्वितीय आहे. त्यांना देवाने एक विलक्षण शक्ती दिली आहे. म्हणूनच त्यांनी जगातले हे आठवे आश्चर्य उभे केले आहे.४मानवता ही वास्तविक सर्वांत मोठी गोष्ट आहे. मानवतेची सेवा हे सर्वांत मोठे कार्य आहे. या अद्वितीय घुमटाच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव व मानवतेचा संदेश जगाला दिला जाईल.’’४तसेच, त्यांनी डॉ. कराड यांना विनंती केली, की नेपाळ येथे उच्च तंत्रशिक्षण विद्यापीठ स्थापनेसाठी त्यांनी योग्य ते सहकार्य करावे.

टॅग्स :Puneपुणे