यावेळी कुलगुरूंसमवेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. मनोहर चासकर, तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर, स्कूल ऑफ फिजीकल सायन्सेसचे संचालक डॉ. सुरेश गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. समर्थ शैक्षणिक संकुलातील टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रॅमला भेट देऊन तेथील अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त प्रयोगशाळा व यंत्रसामग्री यांची पाहणी केली. इंजिनिअरिंग विभागातील टाटा मोटर्सच्या विभागीय प्रशिक्षण केंद्रामध्ये असलेली विविध प्रकारची डिझेल इंजिन,पेट्रोल इंजिन व कट सेक्शन मॉडेल, बॅटरी यांची पाहणी केली. त्याचबरोबर ब्रिजस्टोन टायर ट्रेनिंग सेंटरमधील टायर्सचे प्रकार, झीज होण्याची कारणे व उपाय याबाबतची विस्तृत माहिती प्रॅक्टिकलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. नंतर समर्थ क्रीडा प्रबोधिनीमधील नूतन जिमचे उदघाटन कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शी सुसंगत असून काळाची पावले ओळखून त्यादृष्टीने आपण करत असलेली अंमलबजावणी कौतुकास्पद असल्याचे या वेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर म्हणाले की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विविध उद्योग समूहांबरोबर सामंजस्य करार केले जात आहेत. नामवंत संस्थांबरोबर आणि उद्योग समूहांबरोबर शैक्षणिक करार केले जात आहेत. त्यायोगे सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी अधिकाधिक कौशल्यभिमुख होतील आणि त्यांना नोकरी व व्यवसायाच्या चांगल्या संधी निर्माण होतील. या वेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके उपस्थित होते.कुलगुरू व मान्यवरांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आजपर्यंतच्या शैक्षणिक योगदानाबद्दल समर्थ संकुलातील सर्व प्राचार्यांचा कुलगुरूंच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. प्रदीप गाडेकर यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी केले. आभार डॉ. अनिल पाटील यांनी मानले.
220821\img-20210822-wa0190.jpg
बेल्हा(ता.जुन्नर)येथील समर्थ शैक्षणिक संकुलात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलकुरू यांचा सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी दिसत आहेत.