कोरेगाव ग्रामपंचायतीवर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बापूसाहेब बोधे, विठ्ठल शितोळे, दिलीप शितोळे, अप्पासाहेब कड, अशोक कानकाटे गटाचे तेरापैकी तब्बल अकरा सदस्य निवडून आल्याने, बोधे व शितोळे गटाची एकहाती सत्ता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी किशोर शिंगोटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी विठ्ठल शितोळे, तर विरोधी गटाकडून मंगेश शितोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर उपसरपंचपदासाठी बोधे-शितोळे गटाकडून मनीषा कड यांनी तर विरोधी गटाकडून पल्लवी रमेश नाझीरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी मंगेश शितोळे व पल्लवी नाझीरकर हे दोघेही सभागृहात गैरहजर राहिल्याने, सरपंचपदी विठ्ठल शितोळे यांची तर उपसरपंचपदी मनीषा कड यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर शिंगोटे यांनी केली.
यावेळी आप्पासाहेब कड, सचिन कड, भास्कर कड, दिलीप शितोळे, गणेश शितोळे, पांडुरंग शितोळे, नंदकुमार कड, संपत डिंबळे, लालासाहेब बोधे, बबन कोलते, सुधीर शितोळे, जयसिंग भोसले, अमित इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.