बारामती : अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र) विवेक मोहनराव भोईटे यांना तमिळनाडू ॲग्रिकल्चरल युनव्हर्सिटी
कोईमत्तूर या विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी सन २०१५ ते २०२१ या सहा वर्षांमध्ये कृषी रसायन व मृदा शास्त्र या विभागातील इफेक्ट ऑफ सोर्सेस अँड लेव्हल्स ऑफ सल्फर ओन सोईल न्यूट्रीअंट अवेलेबिलिटी अँड क्वॉलिटी ऑफ बेल्लारी ओनियन इन पुणे डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र या मुख्य विषयावर संशोधन केले. कांद्याचे उत्पादन, गुणवत्ता आणि साठवणक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या संशोधनाचा उपयोग भारतातील शेतकऱ्यांना होईल. त्यांना प्रोफेसर डॉ. एम. आर. भाग्यवती, डॉ. अशोक कडलक, डॉ. सुरेश तळाशीलकर, डॉ. तांबोळी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजेंद्र दादा पवार सुनंदा पवार, राजाराम तुकाराम भोईटे स्मृती आरोग्य प्रतिष्ठानचे चेअरमन डॉ. रमेश भोईटे, सीईओ नीलेश नलावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विवेक भोईटे
१४०८२०२१ बारामती—०९