या पुष्पवाटिकेमध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून, येथील झाडांवर फुलांच्या रंगांच्याऐवजी गुटखा आणि पान खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांमुळे येथील झाडे रंगलेली दिसतात. या रस्त्यांवर पदपथांबरोबर फ्लॉवर बेडमुळे सुशोभीकरण करण्यात आले. परंतु या झाडांची योग्य ती देखभाल घेतली जात नसल्यामुळे ही झाडे मरण्याच्या मार्गावर आहेत. अशीच परिस्थिती रस्ता दुभाजकांमधील झाडांचीदेखील झाली आहे.
................................................................................
महापालिकेने फक्त झाडे लावून आरंभशूरपणा न करता झाडांची योग्य ती देखभाल करून ती जोपासली पाहिजेत. अमोल रासकर, शिवसेना पर्वती शाखाप्रमुख
................................................................................
स्वामी विवेकानंद रस्त्या ला लागूनच असलेल्या पदपथाची व फ्लॉवर बेड ची देखभालीची जबाबदारी ही पथ विभागाकडे असून लवकरच या फ्लॉवर बेड ची दुरुस्ती करण्यात येईल. आदिल तडवी पथ विभाग उपअभियंता
................................................................................