पुणो : दिवाळीतील फटाके म्हटले, की पूर्वी ‘आवाज कुणाच्चा?’ अशी स्पर्धा होत असे. मोठय़ा आवाजाचे फटाके उडविल्यामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होते. याबाबत जनजागृती वाढल्याने आता फटाके उडविण्याचा ट्रेंड बदलत असून, मोठा आवाज करण्यापेक्षा आकाशात आतषबाजी आणि चमचमाट करणा:या फटाक्यांना पसंती दिली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) आकडेवारीवरून यंदाच्या दिवाळीत आवाजापेक्षा दारूच्या आतषबाजीमुळे हवेचे प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.‘एमपीसीबी’कडून दर वर्षी दिवाळी व गणोशोत्सवामध्ये आवाजाच्या प्रदूषणाचे निरीक्षण केले जाते. यंदा फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण यांची नोंद
घेण्यात आली.
दिवसा व रात्री शहरातील 8 ठिकाणी ही नोंद करण्यात आली. त्यांमध्ये शिवाजीनगर, कव्रे रस्ता, येरवडा, स्वारगेट, सातारा रोड, खडकी, कोथरूड, शनिवारवाडा, कोथरूड, मंडई, सारसबाग व कोरेगाव पार्क यांचा समावेश होता. या नोंदीनुसार गेल्या 3 वर्षातील फटाक्यांमुळे होणा:या ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याचवेळी हवेचे प्रदूषण चिंताजनकरीत्या वाढले आहे.
हवेतील प्रदूषणामुळे हवेत तयार होणा:या घटकांचे प्रमाण पीएम 2 आणि पीएम 1क् या एककामध्ये मोजले जाते. हवेतील पीएम 2 चे प्रमाण 6क् मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक,
तर पीएम 1क् चे प्रमाण 1क्क् मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक नसावे.
मात्र, दिवाळीच्या चारही दिवसांत या घटकांनी आपली पातळी ओलांडली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक प्रदूषण नोंदविण्यात आले आहे.
फटाक्यांचा सर्वाधिक त्रस रात्री होतो. मात्र, वेळोवेळी आवाहन करूनही आणि दहानंतर बंदी असतानाही अनेक ठिकाणी फटाके उडविले गेले. विशेषत: शिवाजीनगर, कर्वे रोड भागात सर्वाधिक फटाके रात्रीच्या वेळीच उडविण्यात
आल्याची माहिती प्रदूषण मंडळातील सूत्रंनी दिली.
ध्वनीची तीव्रता दिवसा 75 आणि रात्री 65 डेसिबलपेक्षा अधिक नसावी. यंदाच्या दिवाळीत हे प्रदूषण नियंत्रित राहिले आहे. शहराच्या कोणत्याही भागात या प्रमाणाने आपली तीव्रता ओलांडलेली नाही. त्यामुळे ध्वनीचे प्रदूषण कमी झाले असले, तरी हवेचे प्रदूषण वाढले आहे.(प्रतिनिधी)
दिवाळीतील
ध्वनिप्रदूषण डेसिबलमध्ये
2क्142क्13
शिवाजीनगर68.969.4
कव्रे रस्ता61.959.2
सातारा रस्ता6464.9
स्वारगेट72.978.6
येरवडा48.846.2
खडकी71.271.5
कोथरूड66.767.2
शनिवारवाडा52.951.4
लक्ष्मी रस्ता62.559.7
मंडई65.569.4
सारसबाग57.459
कोरेगाव पार्क66.366.7