पुणे : शहर पोलीस नियंत्रण कक्षातील शंभर नंबरचे व्हॉईस रेकॉर्डर २०१२ पासून बंद असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. शहरावर असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका, वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना व गुन्हेगारी कारवायांमुळे महत्त्वाच्या पोलीस क्रमांकाचे व्हॉईस रेकॉर्डर बंद असणे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते व निर्भय आदर्श मंचाचे अध्यक्ष विनोदकुमार ओझा यांनी माहिती अधिकारात ही बाब समोर आणली. आहे. शंभर नंबरची रेकॉर्डिंग यंत्रणा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी पोलीस महासंचालक व आयुक्तांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शंभर नंंबरचे व्हॉईस रेकॉर्डिंग बंद
By admin | Published: August 27, 2014 5:03 AM