पुणे : मराठा क्रांती माेर्चाच्या अारक्षणासहित केलेल्या विविध मागण्यांचा अाढावा घेण्यासाठी अाठ अाॅक्टाेबरला दिशादर्शक मेळाव्याचे अायाेजन करण्यात अाले अाहे. सायंकाळी 5 वाजता घाेले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरु अार्ट गॅलरीच्या सभागृहात हा मेळावा हाेणार अाहे. याबाबतची माहिती मराठा क्रांती माेर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, रघुनाथ चित्रे पाटील, तुषार काकडे, विकास पासलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्यात यापुढे अांदाेलन चांगल्या पद्धतीने करण्याविषयी कार्यकर्त्यांबराेबर चर्चा केली जाणार अाहे. शिक्षण, व्यवसाय, राेजगार अादी क्षेत्रांत भरीव कामगिरी हाेण्यासाठी विविध समित्या स्थापन करुन त्यामार्फत विविध उपक्रम राबविले जाणार अाहेत. या कामांची तातडीने अंमलबजावणी हाेण्यासाठी व पाठपुरावा करण्यासाठी पुणे जिल्हा व तालुक्यात विविध समित्या नेमण्यात येणार अाहेत. सारथी संस्थेचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे यादृष्टीने समित्यांमार्फत पाठपुरावा करुन कामे करण्यावर भर दिला जाणार अाहे. तसेच अन्य मागण्यांविषयी पाठपुरावा या समित्यांमार्फत स्थानिक पातळीवर व राज्य पातळीवरुन केला जाणार अाहे.
अांदाेलनादरम्यान राज्याच्या विविध ठिकाणी मराठा क्रांती माेर्चाच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात अालेले गुन्हे शासनाकडून मागे घेण्यात येईल अशी घाेषणा मुख्यमंत्र्यांनी केली हाेती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी समिती नेमण्यात येणार अाहे. तसेच मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने कुठलाही राजकीय पक्ष काढण्याचा विचार नसून जे लाेक राजकीय पक्ष काढण्याची घाेषणा करीत अाहेत, त्यांच्याशी मराठा क्रांती माेर्चाचा काहीही संबंध नसल्याचे यावेळी सांगण्यात अाले. समजासाठी सतत चांगले कार्य करणे व अशिक्षित, बाेराेजगार, शेतकरी बांधव, विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्याला मराठा क्रांती माेर्चाचे प्राधान्य राहिल असेही यावेळी सांगण्यात अाले.