शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

महाविद्यालयांतही मतदारनोंदणीची सोय

By admin | Published: September 15, 2016 1:26 AM

महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होणार असून, मतदानापासून पात्र मतदार वंचित राहू नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे दि. १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबरला विशेष मतदार

पिंपरी : महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होणार असून, मतदानापासून पात्र मतदार वंचित राहू नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे दि. १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबरला विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवली जाणार असून, दि. १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी या अंतर्गत नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले. आयुक्तम्हणाले, ‘‘आयोगातर्फे दि. १६ सप्टेंबर २०१६ला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत पालिका कार्यक्षेत्रात (२०५-चिंचवड, २०६-पिंपरी, २०७-भोसरी विधानसभा व २०३-भोर (ताथवडे भाग) या विधानसभा कार्यक्षेत्रात १२०० मतदार केंदे्र आहेत. पालिकेची सर्व (६) क्षेत्रीय कार्यालये, १४ महाविद्यालयांत मतदार सहायता केंद्र दि. १ आॅगस्ट २०१६पासून कार्यान्वित करण्यात आली आहेत. या ठिकाणी १४ आॅक्टोबरला मतदार नोंदणीचे अर्ज सादर करता येणार आहेत. १ जानेवारी २०१७ला वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांना, ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत, अशा पात्र मतदारांना मतदार म्हणून नावे नोंदविण्याची संधी उपलब्ध असणार आहे. पत्त्यातील दुरुस्ती, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची सुविधा ही उपलब्ध करून दिली आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी थेरगाव येथील मनपा शाळा येथे, तर पिंपरी मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी आकुर्डी स्टेशनजवळील डॉ. हेडगेवार भवनात, भोसरी मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी नेहरुनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे, तर भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी भोर येथील प्रांत कार्यालयात मतदार नोंदणीसाठी संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)१४ महाविद्यालयांतदेखील मतदार नोंदणी १४ महाविद्यालयांतदेखील मतदार नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. सांगवी येथील बाबूराव घोलप विद्यालय, पिंपरी येथील मानघनमल उधराम कॉलेज आॅफ कॉमर्स, चिंचवड स्टेशन येथील प्रतिभा कॉलेज आॅफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, पिंपरी येथील डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठानचे इ अँड टीसी कॉलेज, निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी कॉलेज, निगडी प्राधिकरण येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, चिंचवड स्टेशन येथील एटीएसएस कॉलेज आॅफ बिझनेस स्टडीज अँड कॉम्प्युटर अप्लिकेशन, आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कॉलेज, भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, चिंचवड येथील रसिकलाल धारिवाल इन्स्टिट्यूट, ताथवडे येथील राजश्री शाहू कॉलेज, रावेत रोड ताथवडे येथील बालाजी लॉ कॉलेज, वाकड येथील इंदिरा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे.जागृतीवर भरजागृतीसाठी गणेशोत्सव मंडळांना ध्वनिमुद्रित केलेल्या सी.डी.चे वाटप केले आहे. २ लाख पत्रके वाटपाचे काम सुरू असून, गॅस धारकांसाठी सिलिंडरवर स्टिकर्स चिकटवले आहेत. पाणीपट्टीच्या बिलासमवेत मतदार जनजागृतीची पत्रके वितरित केली आहेत. घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या वाहनांवर मतदार नोंदणी करण्याबाबतची जनजागृती करणारे स्टिकर्स व ध्वनिफीत लावण्यात येणार आहे. पथनाट्येही सादर होणार आहेत.’’