शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला! २०१९ च्या तुलनेत सुमारे ४ टक्क्यांची वाढ  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 11:33 AM

पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. १३) मतदान पार पडले...

पुणे : जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांत झालेल्या मतदानाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एकूण मतदान ५३.५४ टक्के; तर शिरूर मतदारसंघात ५४.१६ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. त्यामुळे पुणे मतदारसंघात गेल्या वेळच्या तुलनेत सुमारे चार टक्क्यांची वाढ झाली. शिरूरमध्ये सव्वापाच टक्क्यांची घट झाली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. १३) मतदान पार पडले. त्यात ५१.२५ टक्के मतदान झाल्याची माहिती या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली होती. मात्र, यात बदल होऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली होती. मतदानानंतर २४ तासांमध्ये झालेल्या मतदानाची पुनर्पडताळणी केल्यानंतर अंतिम आकडा कळविण्यात आला आहे. त्यानुसार पुणे मतदारसंघात ५३.५४ टक्के मतदान झाले आहे.

मागील निवडणुकीत अर्थात २०१९ मध्ये पुण्यात ४९.८७ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानात ३.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार एकूण मतदान ११ लाख ३ हजार ६७८ झाले असून, त्यात ५ लाख ८४ हजार ५११ पुरुष; तर ५ लाख १९ हजार ७८ महिला व ८९ तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला. यात ९ लाख ५७ हजार ५९८ मतदारांनी कर्तव्य बजावले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वाधिक २ लाख ४१ हजार ८१७ मतदार वडगावशेरीतील असून, सर्वात कमी १ लाख ४१ हजार १३३ मतदार शिवाजीनगरमधील आहेत. कोथरूडमध्ये २ लाख १७ हजार ४५५, पर्वतीत १ लाख ८९ हजार १८४, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये १ लाख ४९ हजार ९८४ आणि कसबा पेठ मतदारसंघात १ लाख ६४ हजार १०५ मतदारांनी मतदान केले.

शिरूर मतदारसंघात एकूण ५४.१६ टक्के मतदान झाले असून, मागील निवडणुकीत ५९.४४ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा एकूण मतदानात ५.२८ टक्क्यांची घट झाली आहे. या ठिकाणी १३ लाख ७५ हजार ९३५ मतदारांनी मतदान केले, तर ११ लाख ६४ हजार १६९ मतदारांनी मतदान केले नाही. येथे ७ लाख ७३ हजार ९६९ पुरुष, ६ लाख १ हजार ५९१ महिला व ३३ तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदान केलेल्यांमध्ये सर्वाधिक २ लाख ७७ हजार ६४५ मतदार हडपसरमध्ये; तर सर्वात कमी १ लाख ८१ हजार ५८४ मतदार जुन्नरमध्ये झाले. आंबेगावात १ लाख ९० हजार १७९, खेड आळंदीत २ लाख ३ हजार ६७०, शिरूरमध्ये २ लाख ४९ हजार ९७६, भोसरीत २ लाख ७२ हजार ५३९ मतदारांनी मतदान केले आहे.

पुणे मतदारसंघातील मतदान

विधानसभा -- पुरुष -- महिला --तृतीयपंथी -- एकूण --टक्के

वडगावशेरी १,३२,०७०--१,०९,७१९--२९--२,४१,८१७--५१.७१

शिवाजीनगर ७३,७९५--६७,३२३--१५--१,४१,१३३--५०.६७

कोथरूड १,१४,४५१--१,०३,०००--४--२,१७,४५५--५२.४३

पर्वती ९९,२९८--८९,८७१--१५--१,८९,१८४--५५.४७

पुणे कॅन्टोन्मेंट ७८,८२४--७१,१४९--११--१,४९,९८४--५३.१३

कसबा पेठ ८६,०७३--७८,०१७--१५--१,६४,१०५--५९.२४

एकूण ५,८४,५११--५,१९,०७८--८९--११,०३,६७८--५३.५४

शिरूरमधील मतदान

विधानसभा -- पुरुष -- महिला --तृतीयपंथी-- एकूण --टक्के

जुन्नर १,००,४२७ --८१,१५६-- १- १,८१,५८४-- ५८.१६

आंबेगाव १,०५,१५०-- ८५,०२४ --५--१,९०,१७९ --६२.९५

खेड-आळंदी १,१६,१३२-- ८७,५३६-- २--२,०३,६७०-- ५७.७६

शिरूर १,४१,६८२ --१,०८,२८९-- ५--२,४९,९७६-- ५६.९१

भोसरी १,५५,७९३-- १,१६,७३८-- ८--२,७२,५३९-- ४९.४१

हडपसर १,५४,७८५-- १,२२,८४८ --१२--२,७७,६४५ --४७.७१

एकूण ७,७३,९६९ --६,०१,५९१ --३३-- १३,७५,५९३-- ५४.१६

टॅग्स :Votingमतदानpune-pcपुणेshirur-pcशिरूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४