पुणो : विधानसभा निवडणुकीत गेल्या विधानसभेच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला असला तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारांचा उत्साह दांडगा असल्याचे समोर आले आहे.
शहरात सरासरी केवळ 54 टक्के मतदान झाले असून, ग्रामीण भागात मतदानाचे प्रमाण तब्बल 7क् टक्के आहे. जिल्ह्यात 69 लाख 27 हजार 36 मतदार असून, त्यातील 42 लाख 63 हजार 953 मतदारांनी (61.56 टक्के) मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्ह्यात एकूण 36 लाख 44 हजार 715 पुरुष मतदार असून, 32 लाख 82 हजार 283 स्त्री मतदार आहेत. त्या पैकी 23 लाख 1क् हजार 824 पुरुष (63.4क् टक्के) व 19 लाख 53 हजार 123 स्त्री मतदारांनी (59.51 टक्के) मतदान केले आहे. जिल्ह्यातील 13 लाख 33 हजार 891 पुरुष व 13 लाख 29 हजार 16क् स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही.
गेल्या विधानसभा निवडणुकीत 21 मतदारसंघात 54.44 टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसत असले तरी ग्रामीण भागाताच्या तुलनेत शहरी भागातील मतदारांची उदासिनता अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात 21 मतदारसंघ असून, त्यातील पुणो व पिंपरी-चिचंवडमध्ये मिळून 11 व ग्रामीण भागात 1क् मतदारसंघ आहेत.
ग्रामीण भागातील भोर मतदारसंघात सर्वात कमी 68.57 टक्के व शिरुरमध्ये 69.57 टक्के मतदान झाले आहे. उर्वरीत मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी 7क् च्या पुढे आहे. इंदापुर मतदारसंघाने जिल्ह्यात सर्वाधिक 78.43 टक्के मतदान केले. शहरी भागात पिंपरीमध्ये सर्वात कमी 46.2क् व पुणो कॅन्टोन्मेंटमध्ये 47.19 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वाधिक 61.52 टक्के मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे. (प्रतिनिधी)
4ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. जिल्ह्यातील मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांसह एसआरपीएफचे जवानही तैनात असतील.
4पुणो शहरातील वडगावशेरी, शिवाजीनगर, पुणो कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ, हडपसर आणि पर्वती या विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होणार आहे.
4कोथरुड, खडकवासला, पिंपरी,
चिंचवड आणि भोसरी या पाच विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी-म्हाळुंगे येथील क्रीडा
संकुलात आहे.