देहूगाव : देहूगाव-लोहगाव-निरगुडी वडगाव शिंदे गणातील अपक्ष उमेदवार रत्नमाला साहेबराव करंडे यांनी वडगाव शिंदे परिसरातील मतदारांशी शेतांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष भेट घेत प्रचार केला. आजही वडगाव शिंदे निरगुडी, लोहगाव परिसरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या भागातील पायाभूत सुविधा व भौतिक सुविधा उभारणे यांसारख्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मला संधी द्या, असे आवाहन करंडे यांनी वडगाव शिंदे येथे केले. या प्रचारफेरीमध्ये मतदारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, की देहूगाव ही श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी, तर लोहगाव परिसर म्हणजे संत तुकाराममहाराजांचे आजोळ. एक भक्तीच्या नात्यातील माणसांशी सेवेच्या माध्यमातून एक नवे नाते जोडण्यासाठी मी मनापासून प्रयत्नशील आहे. वीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत विविध स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. पद, प्रतिष्ठेपेक्षा जीवनसंघर्ष व निरपेक्ष सेवेतून मिळणाऱ्या आत्मिक समाधानाला महत्त्व देते. पैशाच्या मूल्याधारीत राजकारणापेक्षा वैचारिक मूल्यांचे महत्त्व अधिक आहे. या राजकीय वाटचालीला व प्रामाणिक भूमिकेला तुम्ही साथ द्या, अशी भावनिक हाक दिली. प्रचार फेरीत परिसरातील मतदार महिला व तरुणांचा सहभाग होता. देहूगाव ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील काळोखे, दिलीप काळोखे, योगेश काळोखे,, शंकर काळोखे, सागर भसे, पांडूरंग काळोखे, नंदू काळोखे, सुभाष काळोखे, पांडुरंग हगवणे, नागेश काळोखे, बंडा काळोखे आदी प्रचारफेरीत सहभागी झाले. (वार्ताहर)
बांधावर घेतली मतदारांची भेट
By admin | Published: February 16, 2017 3:06 AM