शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

मतदारांचा कौल! प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताकदीत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 11:52 PM

सलग तीन वेळा शिवसेनेलाच मतदारांचा कौल । विधानसभा निवडणुकांतही युतीनेच मारली बाजी

अविनाश थोरात पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, राष्ट्रवादीमधूनच शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि सलग तीन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. २००९ पासून राष्ट्रवादीच्या विधानसभेतील ताकदीतही घट होऊ लागली आहे. तीन आमदारांवरून २०१४ मध्ये केवळ एकच आमदारावर राष्ट्रवादीचे बळ आले आहे.

२०१४ मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगळे लढले होते. शिरूर लोकसभा मतदारसंघातील केवळ खेडमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. परंतु, युती झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हडपसर आणि शिरूर येथील दोन आमदारांचे बळही त्यांना मिळणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे राज्यातील एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या भोसरीच्या महेश लांडगे यांचीही समजूत काढण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. मात्र, ही सगळी ताकद कागदावर दिसत आहे. प्रत्यक्षात त्याचे मतांत रूपांतर होईल का, याबाबतशंका आहे.

राष्ट्रवादीचा एकच आमदार असला तरी मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समितींमध्ये राष्टÑवादीची ताकद आहे. याशिवाय २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत पक्षांतर्गत गटबाजीचा फटका राष्टÑवादीला बसला होता.हे टाळल्यास राष्टÑवादीचे उमेदवारडॉ. अमोल कोल्हे लढत देऊशकतील. कॉँग्रेसची या मतदारसंघात फार ताकद नाही.हडपसर वगळताइतरत्र त्यांचा प्रभाव नाही. मात्र, हडपसर आणि भोसरी येथीलमतदान निर्णायक ठरणार आहे.शहरी भागातील मतदारांनाआकर्षित करण्यात कोण उमेदवार यशस्वी ठरतोय, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

दोन निवडणुकांचा आढावामतदारसंघाचा आतापर्यंतचा सूरचित्र बदलेल का? कसे?च्राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व तालुक्यांतील शिलेदार एकोप्याने काम करणार का, हा प्रश्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपच्या विरोधात मतदानाची भूमिका घेतली आहे. हडपसर आणि भोसरी या शहरी भागात याचा परिणाम होऊ शकतो. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची भूमिका शिवसेनेसाठी, तर माजी आमदार विलास लांडे यांची मदत कोल्हे यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.विधानसभांचे निकाल 2009 विजयीजागा भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी इतरजुन्नर - - 44.57 48.52 6.91आंबेगाव - - 36.41 58.17 5.42खेड - - 26.11 38.67 35.22शिरूर 29.42 - - 25.30 45.28भोसरी - - 29.68 25.42 30.62हडपसर - 33.48 39.73 - 26.79विधानसभांचे निकाल 2014 विजयीजागा भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी इतरजुन्नर 11.40 2.37 22.02 20.59 30.61आंबेगाव 2.38 1.24 32.08 62.12 1.11खेड 8.28 0.88 51.59 35.24 4.01शिरूर 42.82 1.96 7.95 37.76 9.51भोसरी% 19.72 6.49 20.27 19.98 27.19हडपसर 37.87 10.13 24.01 13.72 14.27

लोकसभेचे निकाल 2009शिवसेना57.54%महाराष्ट्रवादी36.24%बसप2.08%इतर4.14%

2014

शिवसेना59.05%राष्ट्रवादी31.35इतर9.80 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPuneपुणे