शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

अमेरिकेतील "शर्कराकंदा" वर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करणार प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 7:24 PM

शर्कराकंद पीक पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न व्हीएसआयच्या माध्यमातून केला जाणार आ

ठळक मुद्देदहा जातींवर संशोधन : उसाला पूरक म्हणून पीक पद्धतीचा होणार विकास

पुणे : उसाला पर्याय म्हणून शर्कराकंदचा वापर करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने गेली काही वर्षे प्रयत्न सुरु आहेत. आता अमेरिकेतील १० जातींवर देखील व्हीएसआय संशोधन करणार असून, राज्यातील वातावरणात हे पीक कसे येईल, यावर चाचणी करणार आहेत. त्याबाबत दोन्ही देशातील संस्थांमधे नुकताच करार झाला आहे.   मांजरीतील व्हीएसआय संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय साखर परिषद आयोजित केली होती. त्यात अमेरिकेतील डॉ. इमाद एज्युएल यांनी अमेरिकेतील संशोधन केंद्रातील शर्कराकंद पिकाच्या १० जाती व्हीएसआयला देण्याचा करार केला. महाराष्ट्रातील हवामानामधे या जाती कशा तग धरतील यावर व्हीएसआयमधील संशोधक काम करतील. व्हीएसआयने राज्यामधे शर्कराकंदचे प्रयोग या पुर्वीच सुरु केले आहेत. पंजाबमधील राणा शुगरच्या कार्यक्षेत्रामधे व्हीएसआयच्या सहाय्याने १६ हजार एकरवर शर्र्क राकंदची लागवड करण्यात आली आहे. या पिकापासून हेक्टरी ७५ ते ८० टन उत्पादन मिळत असून, १३ टक्के साखर उतारा मिळाला आहे. हिवाळी हंगामातही या पिकाची चाचणी घेण्यात येईल. उसाला तुलनेने अधिक पाणी लागते. पाण्यावर येणारा ताण लक्षात घेता, शर्कराकंदाकडे उसाला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. पाण्याअभावी अनेक कारखान्यांना पुुरेसा ऊस उपलब्ध होत नाही. त्यामुळे नजीकच्या काळात कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात शर्कराकंद पीक पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न व्हीएसआयच्या माध्यमातून केला जाणार आहे. ------------हुमणीवर लागू होणार बुरशीची मात्राउसावरील खोडकिड, लोकरी मावा, अमेरिकन लष्करी अळी आणि हुमणी किडींचा प्रादुर्भाव व त्यासाठीचे जैविक नियंत्रणावरही या परिषदेत चर्चा झाली. हुमणीच्या नियंत्रणासाठी वेब्हीरिया कोंगानेट्री तसेच मेटारायझीयम अ‍ॅनोसपली ही परोपजीवी मित्र बुरशी शेधल्याची माहिती बेंगळुरु येथील नॅशनल ब्युरो आॅफ अ‍ॅग्रीकल्चरल इन्सेक्ट रिसोर्सेसचे (एनबीएआयआर) संचालक डॉ. चंदीश आर. बल्लाळ यांनी दिली. या परोपजीवी मित्र बुरशीची शिफारस केल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.   

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाSugar factoryसाखर कारखाने