चॅरिटेबल ट्रस्ट (धोलवड) यांचा यावर्षीचा उपक्रमशील शाळा पुरस्कार वडगाव आनंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मिळाला आहे.
वडगाव आनंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुंदर व सुविधांनी परिपूर्ण अशी इमारत १९१४ साली इंम्पती फाऊंडेशन मुंबई जिल्हा परिषद पुणे लोकसहभाग यांचे आर्थिक सहभागातून उभी राहिली. याकामी शाळेय व्यवस्थापन समितीचे सामाजिक कार्यकर्ते डी.बी वाळुंज यांनी पुढाकार घेतला. संगणकाचे माध्यमातून शिक्षण, प्रत्येक वर्गात ई लर्निंग सुविधा, स्वतंत्र डायनिंग हाॅल, बोलक्या भिंती दप्तर विन शाळा, परिसरात विविध फुले फळांची झाडे व त्यामधील परसबाग अशी ठळक ओळख असलेल्या या शाळेला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक पुरस्कार मिळाला असताना या ट्रस्टचा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार मिळाला.
प्रा. रतिलाल बाबेल व अक्षदा बाबेल यांचे हस्ते हा पुरस्कार शालेय व्यवस्थापन समितीचे डी. बी. वाळुंज अध्यक्ष संदीप शिंदे, मुख्याध्यापक सुनील टिकेकर, शिक्षकवृंद वृषाली कालेकर, संगीता कुदळे, मनिषा इले यांना प्रदान करण्यात आला.
--
फोटो क्रमांक : २१आळेफाटा उपक्रमशील शाळा
फोटो ओळी.
वडगाव आनंद जिल्हा परिषद शाळेला स्व रामचंद्रजी बाबेल ट्रस्टचा मिळालला उपक्रमशील शाळा पुरस्कार.
210721\21pun_1_21072021_6.jpg
फोटो क्रमांक : २१आळेफाटा उपक्रमशील शाळाफोटो ओळी. वडगाव आनंद जिल्हा परिषद शाळेला स्व रामचंद्रजी बाबेल ट्रस्टचा मिळालला उपक्रमशील शाळा पुरस्कार.