काही व्यापारी छोटा-मोठा व्यवसाय करून आपल्या प्रपंचाला हातभार लावत असतात त्यामुळेच काही व्यापाऱ्यांचा प्रपंच व्यवसायाच्या माध्यमातून चालत असतो शेतीमालाचे नियोजन देखील शेतकऱ्यांचे ढासळले आहे. गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांनी केलेल्या तरकारी पिकांना मोठा फटका बसला आहे अक्षरश; शेतकऱ्र्यांना कलिंगड खरबूज फेकून द्यावी लागली. अनेक शेतकऱ्यांचे कलिंगड, खरबूज, केळी, द्राक्षे, कोबी आदी फळे व तरकारी पिके काढण्यास आली आहे, पुन्हा लॉकडाऊन कडक झाले व भाजी मार्केट बंद झाले, तर शेतकऱ्र्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.
--
गावातील छोटे-मोठे भाजी व्यापार करणाऱ्र्यांचे दुकान देखील बंद असल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. शासनाने दुकाने खुली करण्यास परवानगी द्यावी व तसेच त्यामध्ये सर्व दुकानदारांना ठराविक वेळ द्यावी जेणेकरून सामान्य दुकानदारांना आपला घर प्रपंचाला हातभार लागेल व त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही दुसरीकडे नागरिकांनीही विनाकारण गावात फिरकू नये, मास्कचा वापर करावा. विना मास्क फिरताना दिसल्यास दंड आकारण्यात येणार आहे. शासकीय नियमानुसार गावात कडकडीत बंद पाळला जात आहे .
-सचिन शेलार, सरपंच
--
फोटो क्रमांक : ०८रांजणगाव सांडस बाजारपेठ बंद
फोटो ओळी वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील बाजारपेठ गेल्या दोन दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता गाव कडकडीत बंद आहे.