नऊ दिवसांत विक्रमी1164 रुग्ण
विशाल दरगुडे : चंदननगर -
गेल्या दहा दिवसांमध्ये नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुणे शहरामध्ये जोराने म्हणजे प्रथम क्रमांकाची आहे. यात वडगावशेरी-कल्याणीनगर प्रभाग क्र. 5 मध्ये दररोज सरासरी शंभरच्या पुढेच रूग्ण सापडत आहेत. बुधवारी तर १८२ रुग्ण सापडले आहेत. या परिसरात रुग्णवाढीचा दर दुप्पट झाला आहे.
पूर्वी दहा दिवसाला कोरोनाचे रुग्ण हजार होत होते. मात्र, आता दहा दिवसांमध्ये जवळपास अडीच हजार नवे रुग्ण रुग्ण झाले आहेत. सर्वात जास्त रुग्ण प्रभाग पाच वडगावशेरीमध्ये आहे.
वडगाव शेरी –नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये गेल्या महिन्याभरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये १८ सूक्ष्म प्रतिबंधित्र क्षेत्र आहेत. यामध्ये वडगाव शेरी, खराडी, लोहगाव, शास्त्रीनगर, विमाननगर, पोरवाल रोड या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित्र क्षेत्र आहेत.
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तरी नागरिक निर्बंध पाळत नाहीत. लग्नात पन्नासपेक्षा जास्त नागरिक असतात. मास्क आणि सोशल डिस्टसिंगचा वापर करत नाहीत. दोनशेपेक्षा जास्त नातेवाईकांमध्ये लग्न होत आहे. कल्याणीनगर, विमाननगर, वडगावशेरीमधील हॉटेल गर्दीने फुलले आहेत. कुठेही कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत. भाजी मंडई, मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत आहे. मास्क न वापरणा-यावरील कारवाईच होत नाही. त्याचा गैरफायदा नागरिक घेतात.
दरम्यान,नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 15 ते 24 मार्च च्या दरम्यान 2933 रुग्ण सापडले आहेत. खराडी येथील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले आहे. कोरोना रुग्ण वाढू नये. यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे.वडगाव शेरी प्रभाग 5 मध्ये 1164, खराडी प्रभाग 4 मध्ये 863, विमाननगर प्रभाग 3 मध्ये 496, लोहगाव प्रभाग 42 मध्ये 410 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने पालिकेची चिंता वाढू लागली आहे.
★★★
कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नगर रस्ता आरोग्य विभागाकडून दररोज गर्दीच्या मास्क न वापरणे तसेच सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या ठिकाणी कारवाई केली जात आहे.
-सुहास जगताप,नगररस्ता क्षेत्रीय अधिकारी.
★★★
फोटो ओळ:-नगरस्त्यावर खराडी जुना जकात नाका लक्ष्मी लॉन्स येथील खासगी जागेत बेकायदा बाजारात होणाऱ्या गर्दीत कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत.