सायली जगताप यांनी २०२०-२१ या वर्षामध्ये झालेल्या विविध स्पर्धांमधून नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
पुणे येथे झालेल्या दुसऱ्या ऑल इंडिया ओपन नॅशनल कराटे स्पर्धेत ६० किलो वजन गटात सुवर्णपदक व ओपन गटात सुवर्णपदक, नाशिक येथे झालेल्या दहाव्या ओपन राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ६० किलो वजन गटात सुवर्णपदक व ओपन गटात सुवर्णपदक, पुणे येथे झालेल्या दहाव्या पुणे सिटी कराटे स्पर्धेत ६०किलो वजन गटात सुवर्णपदक, पुणे येथे झालेल्या अठराव्या पुणे जिल्हास्तरीय सिनियर वुशू स्पर्धेत ७० किलो वजन गटात सुवर्णपदक, अमरावती येथे झालेल्या अठराव्या राज्यस्तरीय सिनियर वुशू स्पर्धेत ७० किलो वजन गटात रौप्यपदक संपादन केले आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, उपसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव यांनी अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, डॉ.सुभाष वाव्हळ, प्रा. सुनील ढोरगे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. ऋषीकेश कुंभार, डॉ. नाना झगडे, अशोक कोंढावळे, एम. जी. जगताप, मयूर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
१८ सासवड
सायली जगताप हिचे अभिनंदन करताना प्राचार्या सुषमा भोसले व इतर .