पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुसंख्य मतदारांनी मतदानाचा अद्याप अधिकार बजावलेल नाही. शुक्रवारअखेरपर्यंत केवळ २८३ मतपत्रिका निर्वाचन अधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे. अध्यक्ष निवडीसाठी एकूण १०८५ जणांना मतदानाचा अधिकार आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील मतदार मतदानासाठी पात्र आहेत. त्यांना महिन्याभरापूर्वी मतपत्रिका पोस्टाने रवाना करण्यात आल्या आहेत. पण मत नोंदवून त्या परत येण्याचे प्रमाण फारच कमी आहे. पुढील आठवड्यात मतपत्रिका येण्याची संख्या वाढेल, अशी शक्यता आहे. महिनाअखेरीस एकगठ्ठा मते येतील, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मत नोंदवून मतपत्रिका परत येण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
निर्वाचन अधिकाऱ्यांना मतपत्रिकांची प्रतीक्षा
By admin | Published: October 19, 2015 1:42 AM