शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

वाड्यांना विकासाची प्रतीक्षा, सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष, मालकासोबत भाडेकरूही वैैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:21 AM

१० हजारपेक्षा जास्त जुन्या वाड्यांचा विकास रखडला आहे. प्रशासन त्याबाबत काहीच हालचाल करायला तयार नाही व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांचेही या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे.

पुणे : शहरातील सुमारे १० हजारपेक्षा जास्त जुन्या वाड्यांचा विकास रखडला आहे. प्रशासन त्याबाबत काहीच हालचाल करायला तयार नाही व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांचेही या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. एका संस्थेने पाहणी करून तयार केलेल्या अहवालाला तीन महिने झाले तरी महापालिका प्रशासनाने त्यावर काहीही केलेले नाही.हा अहवाल चर्चेला ठेवून त्यावर निर्णय होणे अपेक्षित होते. तो सरकारला पाठवायचा आहे. त्यानंतर सरकार त्यावर निर्णय घेणार आहे. राज्यातील अन्य शहरांच्या बाबतीत सरकारने आतापर्यंत हीच पद्धत अवलंबली आहे. सरकारनेच असा अहवाल तयार करून घेण्याविषयी महापालिकेला सुचवले होते. तरीही महापालिका या विषयात काही गती घ्यायला तयार नाही. धोकादायक म्हणून अनेक वाड्यांवर महापालिकेने नोटीस लावल्या आहेत. तरीही अशा वाड्यांमध्येसुद्धा अनेक भाडेकरू पर्यायच नाही म्हणून राहत आहेत. जागा लहान, भाडेकरूंची संख्या जास्त, मागण्या मोठ्या, त्यामुळे परवडत नाही म्हणून बांधकाम व्यावसायिक या जुन्या लहान वाड्यांकडे लक्षच द्यायला तयार नाहीत.त्यावर पर्याय म्हणून महापालिकेच्या वतीने राज्य सरकारला क्लस्टर डेव्हलपमेंट अशा नावाने एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यात लहान क्षेत्रफळ असणाºया पण शेजारीशेजारी असलेल्या चार ते पाच वाड्यांच्या मालकांनी एकत्र येऊन इमारत बांधली तर परवानगी द्यावी, असे सुचवण्यात आले होते. मुंबईत ठाणे तसेच अन्य काही शहरांमध्ये अशा पद्धतीने जुन्या चाळी व वाड्यांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. नगरविकास मंत्रालयाने याला मान्यता दिली; मात्र तत्पूर्वी असे केले तर त्या इमारतींमध्ये जास्त सदनिका होतील, त्याचा नागरी सुविधांवर किती ताण येईल, महापालिकेची या सुविधा पुरवण्याची क्षमता आहे का याचा अभ्यास करण्यास सांगितले. ठाण्यात काम केलेल्या त्याच संस्थेचे नावही यासाठी सरकारनेच सुचवले.शिवसेनेचे विशाल धनवडेतसेच महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे श्रीनाथभिमाले हे शहराच्या मध्यभागातील नगरसेवक आहेत. तेही जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करीत आहेत.जुन्या वाड्यांमधील फक्त भाडेकरूच त्रासले आहेत असे नाही तर वाड्यांचे मालकही वैतागले आहेत. त्वरित निर्णय न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा धनवडे यांनी दिला.।अहवाल सादर : कार्यवाही नाहीमहापालिकेने वाडा पाहणीसाठी संस्थेची नियुक्ती केली. त्यांनी शहरातील वाड्यांची पाहणी करून अहवाल तयार करून महापालिकेला दिला आहे. किमान १० हजार चौरस फूट क्षेत्रफळ होत असले तर परवानगी द्यावी, त्यांना जादा एफएसआय किती द्यावा, लोकसंख्येवर त्याचा काय परिणाम होईल, ड्रेनेज व अन्य नागरी सुविधांवर त्याचा किती ताण येईल, अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव या अहवालात आहे.त्यावर आयुक्त तसेच महापालिका पदाधिकाºयांच्या दोन बैठकाही झाल्या. आता हा अहवाल सरकारला पाठवणे गरजेचे आहे, म्हणजे नगरविकास मंत्रालय त्यावर निर्णय घेईल; मात्र महापालिका प्रशासन व पदाधिकारी त्यावर काहीच करायला तयार नाहीत. अहवाल तयार होऊन तीन महिने झाले तरी यावर काहीच हालचाल झालेली नाही.