पुणे : ‘‘चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदांवर काम केले. परंतु, एक वर्षाच्या काळात माझ्यावर अचानक आरोप झाले आणि अनेक चौकशा झाल्या, त्यात तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही. त्यामुळे आता मी पुढील आरोपांची वाट पाहत आहे. त्यातही काहीही आढळणार नाही. केवळ जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात आहे. संघर्षमय जीवन जगत राजकारणाचा प्रवास केला, तसा विद्यार्थ्यांनीही जीवनात संघर्ष करायला हवा’’, असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी सांगितले.न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचा जीवनगौरव पुरस्कार खडसे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एन.सी. जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार आणि सुरेश चव्हाणके यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला.खडसे म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्या क्षेत्रातून निवृत्ती, असे अनेकांना वाटते. मात्र, हा पुरस्कार म्हणजे माझी निवृत्ती नसून नवी सुरुवात आहे. इतरांनी या माध्यमातून माझ्या चांगल्या कामाचे मूल्यमापन केले. त्यामुळे कष्टाचे फलित झाल्यासारखे वाटते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने व कष्टाने भाजपाचे सरकार सत्तेत आले. आज मुंडे असते, तर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली असती.राजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभवले आहेत. सध्या या देशाची धर्मशाळा झाली आहे, अशी उद्विग्नताही खडसे यांनी व्यक्त केली.असल्या मंत्रिपदाला मी लाथ मारतोकाहीही संबंध नसताना माझ्यावर काही महिन्यात सातत्याने आरोप होत गेले. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ होता. ज्याने उभ्या आयुष्यात परिश्रम घेतले, चारित्र्य जपले त्याच्यावर असे आक्षेप घेणे मरणापेक्षा मरण आहे. काय करायचे असले मंत्रिपद ? असल्या मंत्रिपदाला मी लाथ मारतो, असे माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले.देशाची धर्मशाळाझाली आहेराजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभवले आहेत. सध्या या देशाची धर्मशाळा झाली आहे, अशी उद्विग्नताही खडसे यांनी व्यक्त केली.
पुढील आरोपांची वाट पाहतोय, जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात आहे - एकनाथ खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 3:05 AM