पुणो : महापालिकेच्या 2क्14-15च्या अंदाजपत्रकात महापौरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी चंचला कोद्रे यांच्या कालावधीत संपल्याने नवनिर्वाचित महापौर दत्तात्रय धनकवडे यांना निधीसाठी दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करावा लागणार असून, त्यासाठी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. वर्षभरापूर्वीही माजी महापौर वैशाली बनकर यांनी निधी संपविल्याने कोद्रे यांना वर्गीकरणाद्वारे विकास निधी उपलब्ध करून द्यावा लागला होता.
शहरात विविध विकासकामे करण्यासाठी स्थायी समितीकडून महापौर निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून शहरात कोणतेही काम सुचविण्याचा अथवा
एखाद्या संस्थेला मदत देण्याचा अधिकार महापौरांना असतो. त्यानुसार, महापौरांनी दिलेल्या पत्रनुसार प्रशासन हा निधी खर्च करते.
2क्14-15च्या अंदाजपत्रकात महापौर विकास निधीसाठी सुमारे 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, पहिल्या सहा महिन्यांतच कोद्रे यांनी ही तरतूद खर्ची पाडली आहे. त्यामुळे नवीन अंदाजपत्रक येईर्पयत खर्च करण्यासाठी धनकवडे यांना एक रुपयाही शिल्लक नाही.
विशेष म्हणजे, सप्टेंबर 2क्13मध्ये
ज्या वेळी कोद्रे यांच्याकडे महापौरपदाचा पदभार देण्यात आला त्याही वेळी महापौर निधीची अशीच अवस्था होती.
2क्13-14च्या अंदाजपत्रकात या निधीसाठी प्रशासनाने केलेली 5 कोटींची तरतूद बनकर यांनी सहा महिन्यांत संपविली होती. त्यामुळे कोद्रे यांना विकासकामांसाठी स्थायी समितीने 5 कोटींचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून दिला होती. मात्र, जाता-जाता
पुन्हा एकदा माजी महापौरांनी
मागील महापौरांचीच री
ओढल्याने नवनिर्वाचित महापौरांना निधीसाठी वाट पाहावी लागणार
आहे.(प्रतिनिधी)
निधीसाठी जाणार दीड महिना
च्धनकवडे यांनी महापौरपदाचा पदभार घेतला असला, तरी सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने धनकवडे यांना निधीसाठी आणखी दीड महिना वाट पाहावी लागणार आहे.
च्स्थायी समितीकडून हा निधी आचारसंहितेमुळे देणो शक्य नसल्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात निवडणुका संपल्यानंतरच धनकवडे यांना निधी उपलब्ध होणार आहे.
मी खर्च केलेला निधी केवळ स्वत:च्या प्रभागात खर्च केला नाही. महापौरपदावर असताना इतर महापौरांच्या
तुलनेत सर्वात कमी निधी मला मिळाला. त्यातही मी शहरातील रूग्णालयांना उपकरणांसाठी मदत दिली. तसेच, इतर पक्षांच्या नगरसेवकांनाही आपण 25 ते 3क् लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
- चंचला कोद्रे, माजी महापौर