दावडी - आॅगस्ट महिना उजाडला, तरी पूर्व भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील विहिरी कोरड्याच आहेत. शेतातील पिकांना ऐन पावसाळ्यातही कृषीपंपाद्वारे पाणी द्यावे लागत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. शेतकरी पुरेसा पाऊस कधी पडेल, याची वाट पाहत आहे.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी, निमगाव, खरपुडी, रेटवडी, गोसासी, कनेरसर, वरुडे, वाफगाव, गाडकवाडी, टाकळकरवाडी, चिंचबाईवाडी या परिसरात यंदा आॅगस्ट माहिन्यापर्यंत जेमतेम पाऊस पडला. पावसाच्या सरी येतात. मात्र, हा पाऊस पिकांना पुरेसा ठरत नाही. त्यामुळे पाण्याची सोय असलेले शेतकरी ठिबक सिंचनद्वारे, अथवा पाटा वाटे शेतीची भरणी करत आहे. पुर्व भागात शेतक-यांनी बटाटा, वटाणा, मका यासह आदी तरकारी पिके घेतली आहेत.जमिनीच्या ओलाव्यासाठी कृत्रिमरीत्या पाणी भरणाशेतकरी पिकांना पाणी देऊ लागले आहेत. यंदा पाऊस नसल्याने विहिरी, तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. शेतकरी पिकांना पाणी देत असल्याने विहिरीचीही पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी कांदा बी टाकण्यास सुरुवात केली आहे. या कांदा बियाण्याला उगवणीसाठी जामिनीत ओलवा नसल्याने शेतात कृत्रिमरीत्या पाणी भरले जात आहे. पुढील काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास विहिरी, तलाव लवकरच कोरडे पडण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे.निमसाखर परिसरात शेतीसाठी पाणी नाही1निरवांगी : निमसाखर व परिसरात शेतातील विविध प्रकारची पिके यांना पाण्याची अत्यंत गरज भासू लागली आहे. पाण्याअभावी पिके जळून जाऊ लागली आहेत. पाटबंधारे विभागाचे पाणी त्वरित सोडण्यात यावे, अशी मागणी निमसाखर व परिसरातील शेतकरी करीत आहेत.2निमसाखर व परिसरात पाऊस पडला नसल्याने शेतातील विहिरींना पाणी अत्यंत कमी झाले आहे. यामुळे ज्या शेतकºयांच्या विहिरी आहेत, त्यांची ही पिके पाण्यावाचून जळून जाऊ लागली आहेत. जे शेतकरी फक्त कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्याच्या पिकांना तर पाण्याची अत्यंत गरज भासू लागली आहे. त्वरित कॅनॉलचे पाणी मिळणे गरजेचे आहे; अन्यथा शेतकºयांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.3निमसाखर (ता. इंदापूर) येथील विहिरीचे पाणी अत्यंत कमी झाले आहे. या परिसरात पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना त्वरित पाणी मिळणे गरजेचे आहे. शेतकºयांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पावसाची प्रतीक्षा : दावडी परिसरातील विहिरी कोरड्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 1:14 AM