---
राजगुरूनगर: खेड तालुक्यात २३ नोव्हेबर पासुन ९ ते १२ वी पर्यत माध्यमिक शाळा सुरु होऊनही आठवडा उलटला तरी एकेके वर्गात केवळ २-४ विद्यार्थी येत आहेत. त्यामुळे शिक्षक आता विद्यार्थी येण्याची वाट पहात आहेत. एकीकडे ऑफलाईन तर दुसरीकडे ऑनलाईन शिकविताना असे दोन-दोन वेळा शिकवताना दररोज शाळेत येत गुरुजन वर्ग कोरोनाच्या कात्रीतही अडकत आहेत. खेड तालुक्यात आज दि.२ डिंसेबर रोजी ३६ शाळा सुरु झाल्या असुन १४०० विद्यार्थ्यांना ऑफलाईन शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा केला आहे. तर उर्वरीत शाळांमध्ये शिक्षक उपस्थित राहुनही पालकांच्या नकारात्मक भुमिकेमुळे विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे. तालुक्यात १०४ शाळा मिळुन २४ हजार ८९३ विद्यार्थी आहेत. तर ८५१ शिक्षक आणि ४०७ शिक्षकेत्तर कर्मचारी मिळुन १३५१ जणांची चांडोली आणि म्हांळुंगे कोविड सेंटर मध्ये आरटीपीसीआर कोविड चाचणी घेण्यास २० नोव्हेबर पासुन टप्याटप्याने सुरुवात केली मात्र २३ नोव्हेंबर पासुन शाळा सुरु करण्याचे आदेश देऊनही १२२ जणांचे अहवाल प्राप्त झाल्याने पहिल्याच दिवशी १६ शाळा सुरु होऊन १२२७ विद्यार्थी उपस्थित राहिले.गेल्या आठवडाभरात चाचण्या येईल तशा शाळा मुख्यध्यापकांनी सुरु केल्या २८ नोव्हेबरला ३१ शाळा सुर झाल्या मात्र ८६२ विद्यार्थी हजर राहिले होते.
गेल्या आठवडाभरात १०४ शाळांतील १३५१ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे करोना चाचणी अहवालातून चार शिक्षक आणि १ कर्मचारी असे पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले यावरुन तालुक्यात पाच शाळा बंद राहणे अपेक्षित असताना १०० पैकी बुधवार दि.२ डिसेंबर पासून सर्व शाळा सुरु होणे अपेक्षित असताना मात्र ३६ शाळा सुरु होऊन १४०० विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती दाखवल्याने इतर बंद शाळा का याचा आढावा शिक्षण विभागाने घेऊन या मागे घेऊन जाहिर करणे आवश्यक आहे. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळां, आणि शहरी भागातील माध्यमिक शाळा अद्याप ही बंद ठेवण्यात आल्या आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या शाळाही बंद असल्याचे दिसत आहेत.
--
चौकट
शुल्क वसूलीसाठी पालकांकडे तगादा
--
तालुक्यात ९ ते १२ वी पर्यतच्या शाळा सुरु झाल्या असताना. १ ते ८ वी च्या इंग्रजी शाळा अद्यापही सुरु होण्याचे संकेत नसताना संचालकांनी शाळा शुल्क वसूल करण्यासाठी पालकांच्या मागे लागले आहेत. त्याबाबत अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहे. बहुतेक पालकांनी शैक्षणिक वर्ष सुरु होताना प्रवेशासाठी काही रक्कम भरून प्रवेश निश्चित केला. असे असताना दिपावली संपताच शुल्क भरण्याचा तगादा लावण्यात आल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहे.त्यामुळे पालकही आता अर्थिक विंवचेनत असल्याने इंग्रजी शाळेचा ओढा कमी करुन आता जिल्हा परीषद शाळेत प्रवेश घेण्याकडे भर देऊ लागल्याने खाजगी इंग्रजी शाळांचे आता धाबे दणाणू लागले आहे.