पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरून वाल्हे गावामधून वीर, तसेच हरणी, पिंगोरी, वाल्हे येथील आद्य रामायणकार महर्षि वाल्मीकी ॠषींची संजीवनी समाधी मंदिर, वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, वाल्हे येथील श्री भैरवनाथ मंदिर आदी धार्मिक स्थळांना जोडणारा मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, तसेच साईड पट्टीच पूर्ण पणे खचल्यामुळे रस्त्याची उंची जमीनपेक्षा अधिक होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून, त्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने , साठलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक छोटे- मोठे अपघात होत आहेत.
महाराष्ट्र बँकेच्या समोरील रस्ता ते वीर फाटा या ठिकाणच्या रस्त्यावर डांबर व खडी राहिली नसून अनेक मोठ- मोठे खड्डे पडून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.
कोरोना संकटामुळे सर्वच मंदिर बंद ठेवण्यात आले आहेत. दर महिन्यातील अमावास्या दिवशी श्रीक्षेत्र वीर येथील म्हस्कोबा मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणाऱ्या भाविकांना याच रस्त्यावरील खड्ड्यातून वाट काढत देवदर्शनासाठी जावे लागले असते.
पिंगोरी गाव सैनिकांचे गाव आहे. येथील प्रत्येक घरामधील एक जण सैनिक आहे. त्यांनाही आपल्या गावामध्ये पोचण्यासाठी याच खराब रस्त्याने प्रवास करावा लागतो.
वाल्हे गावापासून पिंगोरी व पिंगोरी ते साकुर्डे हा रस्ता देखील मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरून वाल्हे येथील शहीद शंकर चौकापर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत दयनीय झाला असल्याने, सैनिकांच्या गावाला जाण्यासाठी आगोदर याच खडतर रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. तसेच आद्यरामायणकार महर्षी वाल्मीकी ॠषींची संजीवनी समाधी मंदिराकडे याच खडतर मार्गावरून जावे लागते.
--
१५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पिंगोरी गावातील ग्रामस्थानी निवडणुकीवर बहिष्कार टाकत, हा रस्ता लवकर झाला नाही तर येणाऱ्या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल, असे जाहीर करण्यात आले. यानंतर वाल्हे ते पिंगोरी रस्त्याचे काम एक महिन्यात सुरू करण्यात आले होते. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून वाल्हेत जाणारा रस्त्याची दुरुस्ती मात्र अर्धवट राहिली त्यामुळे रस्त्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन करावे लागेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
--
फोटो क्रमांक : १७ वाल्हे रस्ता
फोटोओळ- वाल्हे (ता.पुरंदर) येथील वाल्हे वीर रस्तावर पडलेले मोठे खड्डे व त्या खड्ड्यात पावसाचे साचून राहत असलेले पाणी.
170721\17pun_1_17072021_6.jpg
फोटो क्रमांक : १७ वाल्हे रस्ता फोटोओळ- वाल्हे (ता.पुरंदर) येथील वाल्हे वीर रस्तावर पडलेले मोठे खड्डे व त्या खड्ड्यात पावसाचे साचून राहत असलेले पाणी.