अनेक गावांना मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने वाल्हे येथील बाजारपेठेमध्ये यावे लागते. तसेच, मंगळवारचा आठवडे बाजारासाठी वाल्हे पंचक्रोशील, तसेच पिंगोरी, कवडेवाडी, मांडकी, हरणी, राख, दौंडज, पिसुर्टी आदी गावातील शेतकरी तसेच ग्रामस्थ तसेच व्यावसायिक नीरा, लोणंद, जेजुरी, सासवड येथून आठवडे बाजारासाठी मंगळवारी येत असतात. काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी कोरोना पेशंट अचानक वाढू लागले. तसेच वाल्हे परिसरामध्येही कोरोना पेशंट वाढू लागले मंगळवारपर्यंत वाल्हे परिसरामध्ये ९ रुग्ण असल्याने वाल्हे ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी मंगळवारी सकाळपासूनच बाजारपेठेमध्ये थांबून येणा-या शेतकरी, व्यापारी यांना डिस्टन्सिंग ठेऊन एकाच लाईनमध्ये बसविले.
तसेच ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्या वतीने, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. तसेच मास्क न घातलेल्या व्यक्तींकडून पोलीस प्रशासनाने दंड वसूल करत मास्क घालण्याचे आवाहन केले. त्यामुळे वाल्हे येथील आठवडे बाजारांमध्ये शासनाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सर्व नियमांचे पालन करीत आठवडे बाजार पार पडला.