मात्र परंपरा खंडीत होऊ नये म्हणून यात्रेतील सर्वविधी म्हणजे १ तारखेला कुंभार वाड्यातून देव देवळात जाणार, २ तारखेला देवाची हळदीचा कार्यक्रम होणार आहे. तर ३ तारखेला श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा कार्यक्रम होणार असून तो ऑनलाईन पध्दतीने पाहता येणार असून पुजारी व ठराविक मोजक्या मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. तरी चालू वर्षी काठी, पालखी, ढोल ताशा व छबिना या गोष्टी होणार नाहीत, अशी माहिती पुजारी बाबा आगलावे व सचिन आगलावे यांनी दिली. त्याच बरोबर वाल्हे मंदिरात शासन नियमांचे पालन करीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती सचिन दुर्गाडे यांनी दिली. तर यात्रेच्या काळात सर्व नागरिकांनी शासन नियमांचे पालन करण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा बँक संचालक प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, भैरवनाथ ट्रस्ट चे शशिकांत दाते, माजी सभापती गिरिष नाना, प्रताप पवार यांनी केले आहे.
वाल्हेची यात्रा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:10 AM