त्याचे घडले असे की, कोरोना लसीची चौकशी करण्यासाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात समीर शेटे गेले होते. त्यांना तिथे रस्त्यावरच पडलेले पाकीट (लेडीस पर्स) सापडले. पाकिट उघडून पाहिल्यावर त्यामध्ये मोठी रक्कम व सोन्याची अंगठी दिसली. पाकिट उचलताना त्या युवकाला कोणी पाहिलेही नव्हते व परिसरात सीसीटीव्ही नव्हते त्यामुळे ते पाकिट ते सहजज लंपास करू शकले असते. मात्र त्यांनी ते पाकीट प्रामाणिकपणे पोलीस हवालदार सुभाष गिरे, विश्वनाथ जाधव यांच्याशी संपर्क करून पोलीस ठाण्यात जाऊन जमा केले. दरम्यान ते पाकीट ज्यांचे आहे त्या रंजना संपत गिरे शिरवली (ता. भोर) यांना त्यांचे पाकीट हरविल्याचे लक्षात आले व त्यांनी त्यांच्या ओळखीच्या होमगार्ड किरण कानडे यांना सांगितले होते. पोलीस हवालदार सुभाष गिरे, विश्वनाथ जाधव यांनी पैशाचे पाकीट समीर शेटे यांना सापडले असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांना सांगितले. निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजना गिरे हिला पोलीस स्टेशनला बोलून तिच्यासमोर पाकीट उघडले असता त्यामध्ये आठ हजार पाचशे रुपये रोख रक्कम व सोन्याची अंगठी असे त्या पाकिटात आढळून आले. खात्री झाल्यानंतर भोर पोलिस स्टेशनमध्ये समीर सुरेश शेटे यांनी बोलावून घेवून यांच्या हस्ते अंजना गिरे यांना त्यांचे त्याचे पाकीट देण्यात आले. त्यामुळे अंजना गिरे यांना खूप आनंद झाला. प्रामाणिकपणे सापडलेले पाकीट परत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे व राजेंद्र पवार यांनी समीर शेटे यांचे अभिनंदन केले.
फोटो - सापडलेले पैशाचे पाकीट परत करताना समीर शेटे.
--
१५ महुडे पैशाचे पाकिट