शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

विषमतेच्या भिंती तोडाव्या लागतील

By admin | Published: March 26, 2017 2:15 AM

सध्याच्या अस्वस्थ वर्तमानात संकल्पचित्र आणि व्यावहारिक तपशील यांचा मेळ घालण्याची गरज आहे.

पुणे : सध्याच्या अस्वस्थ वर्तमानात संकल्पचित्र आणि व्यावहारिक तपशील यांचा मेळ घालण्याची गरज आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आपण वैश्विक होण्याऐवजी संकुचित झालो आहोत. मोदी, ट्रम्प यांच्यासारख्या नेतृत्वामुळे भिंती पडल्या की उभ्या राहिल्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या भिंती तोडण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केले.सामाजिक कृतज्ञता निधी संस्थेच्या वतीने वार्षिक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते. यंदाचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मुंबईचे गजानन खातू, एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार वाईच्या उषा ढवण आणि डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार जगदीश खैरालिया यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी भावे बोलत होत्या. ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, सुभाष वारे आदी या वेळी उपस्थित होते.भावे म्हणाल्या, ‘‘मूल्यांचा गाभा असलेलेच लोक परिवर्तनाचे स्वप्न पाहू शकतात. सध्या बदल आणि परिवर्तन यांतील बदलच कळेनासा झाला आहे. राज्यकर्त्यांनी विकासाचे गारूड निर्माण केले आहे. विकास या शब्दाचेच भय वाटू लागले आहे. शासनाविरुद्ध बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जाते. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांना मरू देणार नाही, असे किंचाळून सांगणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मरू देणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकडेवारीकडे गांभीर्याने पाहिले जाणार का? ही समीकरणे बदलण्यासाठी तरुण पिढीला नवी ऊर्जा द्यावी लागेल. रोजच्या जगण्यातील बदलांतून सामान्य माणसाची गुणवत्ता वाढविण्याची आणि माणसातील गुंतवणुकीची गरज आहे.’’उषा ढवण आणि जगदीश खैरालिया यांनीही मनोगत व्यक्त केले. सुभाष वारे यांनी प्रास्ताविक केले. काका पायगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एवढा निधी मिळतो कोठून ? मुख्यमंत्री गडबडल्यासारखे का वागत आहेत? त्यांना शेतकऱ्यांबाबत ठोस भूमिका घेता येत नाही का? असा सवाल करीत बाबा आढाव म्हणाले, ‘‘संसदीय लोकशाहीत उलथापालथ होत आहे. मूलभूत प्रश्नांना तोंड फुटले आहे. सरकारच यशामुळे सुस्त झाले आहे आणि सर्वांना शत्रू मानत आहे.४कर्जमाफीच्या मागणीवर संघर्ष होत असताना शेतीमालाच्या हमीभावाबाबत कोणीच बोलत नाही, हा धोका आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची, सरकारला पर्याय देण्याची आवश्यकता आहे. पर्यायाशिवाय काळाचे आव्हान स्वीकारता येणार नाही. निवडणुकीत मिळालेले प्रचंड यश सरकार कसे पचवते, याकडे सर्वांचे बारकाईने लक्ष आहे.’’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एवढा निधी मिळतो कोठून, असा सवालही त्यांनी केला.शेतकरी संघटनांचे नेते आंदोलन करून सत्ताधारी झाले. शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थे आहे. आजची पिढी बंडखोर झाली आहे. त्यांच्या बंडखोरीचे योग्य दिशेने बंडात परिवर्तन करावे लागेल. प्रश्नांची उत्तरे स्वत:च्याच देशात शोधावी लागतील. त्यासाठी स्वत:च्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाजाशी, नव्या पिढीशी सुसंवाद साधावा लागेल. भारताची अर्थव्यवस्था शेतीमुळे टिकून आहे. त्यामुळे शेतीमालाला रास्त दर मिळाला, तर अर्थव्यवस्थेला गती मिळेल.- गजानन खातू