बारामती उपविभागात १४ लाख
८४ हजार ९६० रूपयांचा दंड वसूल
बारामती उपविभागात १४ लाख
८४ हजार ९६० रुपयांचा दंड वसूल
बारामती : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन वारंवार मार्गदर्शक नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांना आवाहन करीत आहे. तरीही काही महाभाग नियमांना हरताळ फासताना आढळून येत आहेत. विनामास्क फिरणारे,जमावबंदीचे उल्लंघन करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. जानेवारी २०२१ पासून ते ३ एप्रिलपर्यंत बारामती उपविभागामध्ये पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार ९१८ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ८४ हजार ९६० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
बारामती उपविभागात नवीन वर्षात १ जानेवारी ते ३ एप्रिलपर्यंत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार ९१८ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ८४ हजार ९६० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. उपविभाग हद्दीमध्ये विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एकूण ६ हजार ९१८ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर या कारवाई अंतर्गत एकूण १४ लाख ८४ हजार ९६० चा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. मार्गदर्शक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर १८८ अन्वये व कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- नारायण शिरगावकर
उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती.
बारामती उपविभागामध्ये झालेली कारवाई
(१ जानेवारी ते ३ एप्रिल २०२१)
पोलिस ठाणे एकूण कारवाई दंड
बारामती शहर १,५०३ ३,१६,५००
बारामती तालुका १,१२० २,८८,९००
वडगाव निंबाळकर १,०८४ १,८८,८००
वालचंदनगर १,२०५ २,४८,६००
इंदापूर ९४२ २,११,६६०
भिगवण १,०९८ २,२७,७००
--------------------------------------
मंगल कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर
झालेली कारवाई (१ जानेवारी ते ३ एप्रिल २०२१)
पोलीस ठाणे कारवाई
बारामती शहर १०
बारामती तालुका १२
वडगाव निंबाळकर १३
वालचंदनगर १३
इंदापूर ०७
भिगवण ४१
--------------------------------