पुणे : ससून रुग्णालयात स्वतंत्र ‘ओबेसिटी क्लिनिक’ सुरू करण्यात आल्याचे ससूनचे अधिष्ठता डॉ. अजय चंदनवाले यांनी येथे सांगितले.या ओबेसिटी क्लिनिकचे उद्घाटन चंदनवाले यांच्या हस्ते झाले. चंदनवाले म्हणाले, की या ओबेसिटी क्लिनिकचा मुख्य उद्देश वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स, रुग्णातील लठ्ठपणाचे स्क्रिनिंग करणे, तपासणी झाल्यानंतर लठ्ठपणाचे निदान झाल्यास समुपदेशनापासून, आहार, व्यायामाचा सल्ला, निरोगी जीवनशैलीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, औषधोपचार करण्यात येणार आहेत. बॉडी मास इंडेक्स ४० च्यावर असल्यास बॅरियाट्रिक सर्जरीही या क्लिनिकमध्ये करण्यात येणार आहे. ससूनमध्ये दर बुधवारी तपासण्या करण्यात येणार आहेत. या वेळी उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. सुस्मिता भट्टाचार्य, डॉ. शशिकला सांगळे, डॉ. अजय तावरे, डॉ. सोमनाथ सलगर, डॉ. हरीष टाटिया, ओबेसिटी क्लिनिकच्या फिजिशियन डॉ. वसुधा सरदेसाई उपस्थित होते.
वजन कमी करायचेय?; ससून रुग्णालयाच्या ‘ओबेसिटी क्लिनिक’ची होणार मदत, दर बुधवारी चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 1:31 PM
ससून रुग्णालयात स्वतंत्र ‘ओबेसिटी क्लिनिक’ सुरू करण्यात आल्याचे ससूनचे अधिष्ठता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. या ओबेसिटी क्लिनिकचे उद्घाटन चंदनवाले यांच्या हस्ते झाले.
ठळक मुद्देससूनमध्ये दर बुधवारी करण्यात येणार तपासण्याबॉडी मास इंडेक्स ४० च्यावर असल्यास क्लिनिकमध्ये करण्यात येणार बॅरियाट्रिक सर्जरी