पुणे : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तलाठी पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या असून, परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान होणार आहेत. यासाठीची तयारी पूर्ण झाली असून, पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान १० दिवस आधीच समजणार असून, हॉल तिकीट तीन दिवस आधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे.
याबाबत भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक व अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘राज्यभरात ४ हजार ४६६ तलाठी पदांसाठी ११ लाख १० हजार ५३ उमेदवारांनी अर्ज केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असून, ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि दुपारी ४.३० ते सांकाळी ६.३० या काळात ही परीक्षा होईल. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा केंद्र मात्र तीन दिवस आधी हॉल तिकिटाबरोबरच कळविले जाईल.’
परीक्षेचे टप्पे
पहिला टप्पा- १७ ते २२ ऑगस्ट
दुसरा टप्पा- २६ ऑगस्ट ते १ सष्टेंबर
तिसरा टप्पा- ४ ते १४ सप्टेंबर