हा रस्ता पुणे महानगरपालिकेच्या डीपी प्लॅनमध्ये दर्शिवला आहे. कोरोना काळाचा फायदा घेत या रस्त्यावर गेट बांधून बंद केल्याचा आरोप शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित शेलार व परिसरातील नागरिकांनी केला आहे. या बंद असलेल्या रस्त्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली.
यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अमित शेलार यांनी सांगितले.
वर्षोनुवर्षे सुरु असलेला रस्ता अचानकपणे बंद केला गेला असल्याने आपात्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन व रुग्णवाहिका यांंना अडचण निर्माण होण्याची शक्यता येथील नागरिकांनी दर्शविली आहे. नागरीक आपली वाहने रस्त्यावर बंद गेटसमोर लावून दिलेल्या छोट्या जागेतून घराकडे जात आहेत. वृद्ध, शाळेत जाणारे विद्यार्थी, महिला व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे सदरील रस्ता तात्काळ नागरिकांच्या वापरासाठी खुला करावा याकरिता अमित शेलार, सहकारी मित्र परिवार, स्थानिक नागरीक यांनी जिल्हाधिकारी पुणे, आयुक्त पुणे महानगरपालिका, उपविभागीय अधिकारी पुणे, तहसीलदार पुणे यांना निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.
फोटो : गेट लावून बंद करण्यात आलेला रस्ता...